kareena Kapoor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor: करिअरच्या २५ वर्षांनंतर येणार बॉलिवूडच्या बेबोचा सर्वात महागडा चित्रपट; कधी होणार रीलीज?

Kareena Kapoor New Movie: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला अभिनय क्षेत्रात २५ वर्ष पूर्ण झाले आहेत. करीनाच्या आयुष्यातील सर्वात मोठा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान ९०च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपेकी एक आहे. करीनला फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करुन आता २५ वर्ष पूर्ण होतील. करीनाने २०००मध्ये अभिषेकसोबत ‘रेफ्युजी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. करीनाने तिच्या जबरदस्त अभिनयामुळे अनेक चाहत्यांच्या मनामध्ये घर केलं आहे. सध्या करीनाचा 'द बर्किघम मर्डस' हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बेबोच्या PVR आणि INBOX मध्ये गाजलेल्या चित्रपटांचं पुन्हा एका स्क्रिनिंग होण्याची चर्चा सुरू आहे.

कपूर कुटुंबीय सिनेसृष्टीमधील सर्वात प्रसिद्ध घराणं आहे आणि त्यामधील प्रसिद्ध अभिननेत्रींपैकी म्हणून करीनाची ओळख आहे. करीनाने अनेक ब्लॉकबास्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. माहितीनुसार मुंबईमध्ये लवकरचं करीनाच्या नावाने एक मोठा फिल्म फेस्टिव्हल होणार आहे.

मुंबईमध्ये होणाऱ्या फेस्टिव्हलची घोषणा PVR आणि INBOX या दोन्ही थिएटर्सकडून करण्यात आली होती. मुंबईमधील काही चित्रपटगृहांमध्ये हा फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे. या फेस्टिव्हलदरम्यान करीनाचे ब्लॉकबास्टर चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहेत. या बातमीच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये भरपूर उत्सुकता निर्माण झालीय. रिपोर्टनुसार, करीनाने भारतामधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक चित्रपट साईन केला आहे. गेल्या ९ महिन्यांमध्ये करीनाला अनेक मोठ्या पॅन इंडिया चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या, त्यामधील एक चित्रपट अभिनेत्रीने कन्फर्म केला आहे. करीनाचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वात मोठा हिट चित्रपट ठरू शकतो. या चित्रपटामध्ये करीना आपल्याला एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.

माहितीनुसार करीना आणि महेश बाबू राजामौली यांच्या SSMB 29 या चित्रपटामध्ये दिसू शकते. हा चित्रपट बनवण्यासाठी एकूण १००० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. करीनाच्या पॅन इंडियाच्या चित्रपटामध्ये करीनाऐवजी सिनेसृष्टीमधील दिग्गज कलाकार देखील दिसणार आहेत. करीनाच्या या चित्रपटाच्या शुटिंगची सुरुवात २०२६ पासून होणार आहे. या चित्रपटांची घोषणा झाली आहे, मात्र नाव अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

SCROLL FOR NEXT