फॉर्च्यून इंडिया 2024 च्या रिपोर्टनुसार, बॉलिवूडची स्टार करीना कपूर खानही ( kareena Kapoor) भारतातील सर्वाधिक कर भरणारी महिला सेलिब्रिटी (Highest Tax Paying Female Celebrity) बनली आहे. करिनाने अनेक मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. बॉलिवूडची बेबोने या वर्षी महिला सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक कर भरला आहे. करीना कपूरने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 20 कोटी रुपयांचा कर ( Tax ) भरला आहे.
करीना कपूरची एकूण मालमत्ता किती?
करीना कपूर ही बॉलिवूड मधील मोठी अभिनेत्री आहे. तिने आपल्या लूक आणि अभिनयाने प्रेक्षाकांच्या मनावर राज्य केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बेबोची एकूण मालमत्ता ( Net Worth) 485-490 कोटी रुपये आहे. करीना कपूर खान ही नेहमी लक्झरी आयुष्य जगताना दिसली आहे.
करिनाचे आगामी चित्रपट
करिना अलिकडेच 'क्रू' या चित्रपटात दिसली. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. यातील करिनाची भूमिका प्रेक्षकांना भरपूर आवडली. या चित्रपटात करीनासोबत क्रिती सेनॉन आणि तब्बू देखील दिसली. आता बेबो आगामी थ्रिलर चित्रपट 'द बकिंगहॅम मर्डर्स' या चित्रपटासाठी सज्ज आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या आगामी चित्रपटात देखील करीना कपूर दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ इत्यादी मोठे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'सिंघम अगेन' दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.फॉर्च्यून इंडिया 2024 च्या रिपोर्टनुसार, बॉलिवूडची स्टार करीना कपूर खानही भारतातील सर्वाधिक कर भरणारी महिला सेलिब्रिटी बनली आहे. करिनाने अनेक मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. बॉलिवूडची बेबोने या वर्षी महिला सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक कर भरला आहे. करीना कपूरने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 20 कोटी रुपयांचा कर भरला आहे.
करीना कपूर - 20 करोड रुपये
कियारा अडवाणी - 12 करोड रुपये
कतरिना कैफ- 11 करोड रुपये
बॉलिवूडचा किंग खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. फॉर्च्यून इंडिया 2024 रिपोर्टनुसार, सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये किंग खान पहिल्या क्रमांकावर आहे. शाहरुख खानने (Shah Rukh Khan) एकूण 92 कोटी रुपयांचा कर भरला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.