Rakesh Roshan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rakesh Roshan : एक चूक अन् पडलं टक्कल, राकेश रोशन यांचा लूकच बदलला

Rakesh Roshan Hair Secret : बॉलिवूडचे अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या लूकमध्ये एका वेळेनंतर खूप बदल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. राकेश रोशन यांच्या केसांमुळे त्यांचा लूक बदलला. त्यांच्या 'या' टक्कल मागचे नेमकं कारण जाणून घेऊयात.

Shreya Maskar

राकेश रोशन (Rakesh Roshan) हे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. चित्रपट सृष्टीमध्ये एक नवजलेला नाव म्हणून त्यांची ओळख आहे. राकेश रोशन यांनी कर्करोगावर मात करत अभिनय आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अभिनेता राकेश रोशन यांनी 'घर-घर की कहानी' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.

खरंतर राकेश रोशन त्यांच्या जुन्या चित्रपटात हिरो दिसायचे. त्यांचे केस अनेकांना आवडायचे. मात्र आता राकेश रोशन यांच्या डोक्यावर टक्कल आहे. त्यांचा आधीच लूक आणि आताचा लूक यामध्ये जमीन अस्मानाचा फरक पाहायला मिळतो. आता या बदला मागच नेमकं कारण जाणून घेऊयात की , आता अभिनेते राकेश रोशन यांच्या डोक्यावर टक्कल कसे पडले?

राकेश रोशन यांच्या टक्कल मागचे खरे कारण?

राकेश रोशन हे दिग्दर्शनाची धुरा सांभाळल्यावर खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोकात आले. राकेश रोशन यांनी 'खुदगर्ज' चित्रपटाच्या यशासाठी नवस केला होता. 'खुदगर्ज' या चित्रपटामुळे राकेश रोशन यांच्या डोक्यावर टक्कल पडले.

राकेश रोशन यांचा खुदगर्ज हा चित्रपट खूप हिट ठरला. यामुळे त्यांनी तिरुपती बालाजीला जाऊन केस दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या 'खून भरी मांग' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पत्नीसह तिरुपती बालाजीला गेले होते. तेव्हा त्यांच्या बायकोने 'खुदगर्ज' चित्रपटाच्या वेळी केलेल्या नवसाची आठवण करून दिली. त्यामुळे त्याच वेळी राकेश रोशन यांनी आपला नवस पूर्ण केला. डोक्यावरचे सर्व केस कापून टाकले. तेव्हा पासून त्यांच्या डोक्यावर टक्कल पडले. कारण त्यानंतर त्यांना केस कधी आलेच नाही. यानंतर राकेश रोशन यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्यांनी आपल्या दिग्दर्शनाच्या बळावर देखील चाहत्यांची मनं जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT