Ayushman Khurrana And Shahrukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ayushman Khurana: शाहरुखच्या बंगल्यासमोर आयुष्मानची 'मन्नत'

लाखोचाहते फक्त मन्नत समोरून जाण्याचे स्वप्न पाहतात. या यादीत केवळ सामान्य लोकच नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ayushmann Khurrana Shares Mannat Photo: शाहरुख खानचा बंगला 'मन्नत' चाहत्यांसाठी एखाद्या स्वप्नातील महालापेक्षा कमी नाही. लाखोचाहते फक्त मन्नत समोरून जाण्याचे स्वप्न पाहतात. या यादीत केवळ सामान्य लोकच नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे. होय, नुकताच आयुष्मानने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर मन्नतच्या बाहेरील फोटो शेअर केले आहेत. या पोस्टसोबत आयुष्मानने काही कॅप्शन लिहित त्याने हा फोटो शेअर केला आहे.

आयुष्मान खुरानाने अलीकडेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये आयुष्मान त्याच्या कारच्या सनरूफवर उभा आहे आणि हसताना दिसत आहे. त्याने केलेले हावभाव पाहून तो इच्छा मागत असल्याचे दिसत आहे. आयुष्मानने त्याच्या पोस्टवर कॅप्शन देत लिहीले, 'मन्नत समोरुन जात होतो, तर एक मन्नत मागितली'.

आयु़ष्मानचा हा फोटो रविवारी रात्रीचा आहे. जेव्हा आयुष्मान शाहरुख खानच्या घरासमोरून जात होता. आयुष्मानही स्वत:ला शाहरुखचा मोठा चाहता असल्याचे सांगतो. त्यावेळी त्याने बंगल्यासमोरील एक फोटो काढत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. त्याने फोटोला कॅप्शन देत एक हॅशटॅगही दिलेला आहे. आयुष्मानने #SRKian असे लिहीले आहे.

आयुष्मानने या पोस्टमध्ये एक गाणे शेअर केले असून शाहरुखच्या बाजीगर चित्रपटातील हे गाणे आहे. या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. आयुष्मानच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्यांसोबतच कलाकार मंडळींनीही कमेंट केल्या आहेत. या फोटोवर प्रतिक्रिया देताना अभिनेता मनीष पॉलने लिहिले की, 'सर्वात आवडतीचे गाणे' यासोबतच एका चाहत्याने 'मुंबईतील माझे आवडते ठिकाण' असे लिहिले आहे.

आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी 'अ‍ॅक्शन हिरो' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित झाला होता, जो प्रेक्षकांनाही आवडला होता. त्या चित्रपटात अभिनेता जयदीप अहलावतही आयुष्मान खुरानासोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आयुष्मान त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामध्ये नोरा फतेहीसोबत आयुष्मानची केमिस्ट्री सर्वांनाच आवडत आहे. हा चित्रपट २ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dohale Jevan History: गरोदर महिलेचे डोहाळे जेवण का करतात? कधीपासून सुरू झाली ही प्रथा

Maharashtra Live News Update: खासदार संजय राऊत आज अहिल्यानगर दौऱ्यावर

भंडारदऱ्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, १५ ते १७ ऑगस्टदरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?|VIDEO

Kurla To Vengurla: गावतल्या मुलांची लग्न का नाही होतं? 'कुर्ला टू वेंगुर्ला' चित्रपटात उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट

Shukra Surya Yuti: शुक्राच्या राशीत बनणार पॉवरफुल शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या प्रत्येक इच्छा होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT