Anil Kapoor Networth Saam TV
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor Birthday: ‘मिस्टर इंडिया’ एका चित्रपटासाठी किती मानधन घेतो?; अभिनेत्याची आहे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती

Anil Kapoor News: 'मिस्टर इंडिया'च्या वाढदिवसानिमित्त त्याच्या थोडक्यात सिनेकारकिर्दिबद्दल आणि त्याच्या नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत.

Chetan Bodke

Anil Kapoor Networth

'माय नेम इज लखन' हे गाणं ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर बॉलिवूडमधील एव्हर ग्रिन हिरो अनिल कपूर (Anil Kapoor) आवर्जून येतो. हँडसम हंक, आपल्या हटक्या स्टाईलमुळे आणि डान्सने अनिल नेहमीच चाहत्यांचे मनं जिंकतो. आज त्यांचा ६७ वा वाढदिवस आहे.

कायमच सोशल मीडियावर अनिल कपूर यांच्या फिटनेससोबतच अभिनयाचीही जोरदार चर्चा होत असते. अनिल कपूर यांच्या नावावर अनेक ब्लॉकबस्टर, हिट चित्रपट आहेत. मात्र यशाच्या शिखरावर पोहोचणं अनिल यांच्यासाठीही सोपी गोष्ट नव्हती.

आज आपण या 'मिस्टर इंडिया'च्या वाढदिवसानिमित्त त्याच्या थोडक्यात सिनेकारकिर्दिबद्दल आणि त्याच्या नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत.

अनिल कपूर मुळचे मुंबईकर आहेत. त्यांचा जन्म सुरेंदर कपूर या निर्मात्याच्या घरी मुंबईतील चेंबुरच्या टिळक नगर परिसरात झाला. भाऊ बोनी कपूर, अनिल कपूर आणि धाकटा भाऊ संजय कपूर हे तिघे भाऊ. या कपूर फॅमिलीने आपलं नशीब अभिनयक्षेत्रातच आजमावलं. अनिल कपूर यांची परिस्थिती फार हालाखीची होती.

अनिल कपूर मुंबईमध्ये, राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये कुटुंबासह राहायचे. पैशाच्या चणचणीमुळे त्यांना गॅरेजमध्ये राहायला लागले होते. अनेक वर्ष गॅरेजमध्ये राहिल्यानंतर त्यांनी मुंबईत खोली भाड्याने घेतली, या भाड्याच्या खोलीत ते अनेक वर्ष राहत होते. पण जरीही असं असलं तरी, ते आज बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. (Bollywood)

अनिल कपूर बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्यांनी चार दशकाहून अधिक काळ चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले आहे. आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेटवर्थबद्दल जाणून घेऊया. अनिल कपूर यांची एकूण संपत्ती १४० कोटींच्या आसपास आहे.

एका चित्रपटासाठी अनिल कपूर २ ते ४ कोटी इतके मानधन आकारतो. अनिल कपूरचा मुंबईतील जुहू येथे एक आलिशान बंगला असून त्याची किंमत ३० कोटी रुपये इतकी आहे. एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी अनिल कपूर ५५ लाख रुपये इतके पैसे आकारतो.

अनिल कपूरची परदेशातही कोट्यवधींची संपत्ती आहे. अनिल कपूरकडे BMW, Mercedes Benz S Class, Bentley, Jaguar आणि Audi सारख्या अलिशान आणि महागड्या कार आहेत. (Bollywood Actor)

अनिल कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नुकतंच तो ‘ॲनिमल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सध्या संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी करताना दिसत आहे. ‘फायटर’ चित्रपटातून सुद्धा अनिल कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अभिनेता आपल्या आगामी चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT