Mumbai Pune Highway: मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकर पडले घराबाहेर

Mumbai Pune Highway Traffic Jam: अशात शनिवार, रविवार आणि सोमवारी गुरु नानक जंयतीची सुट्टी असल्याने सर्वचजण घराबाहेर पडलेत. यामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
Mumbai Pune Highway
Mumbai Pune HighwaySaam TV
Published On

दिलीप कांबळे

Mumbai Pune Highway:

सुट्टी म्हटलं की सर्वच चाकरमान्यांना गावी जाण्याची ओढ लागते. मुंबईत कामानिमित्त आलेले नागरिक सुट्टीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचा प्लान करतात. काहीजण कुटुंबासह तर काही जण आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी जाण्याचा बेत आखतात. अशात शनिवार, रविवार आणि सोमवारी गुरु नानक जंयतीची सुट्टी अशा सलग तीन सुट्ट्या असल्याने सर्वचजण घराबाहेर पडलेत. यामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

Mumbai Pune Highway
Groom Viral Video: नवरदेवाचा अनोखा स्वॅग! गळ्यात घातला २० लाख नोटांचा हार; वरातीचा VIDEO जोरदार व्हायरल

जुना पुणे मुंबई महामार्गावर (Mumbai Pune Highway) सोमाटणे टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी बघायला मिळतेय. वाहनांची संख्या वाढल्याने आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे जुन्या मार्गावर वाहनांची गर्दी झालीये. किमान तीन ते चार किलोमीटरपर्यत या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांना या वाहतूक कोंडीतून (Traffic Jam) आपले वाहन काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

राज्यात १५ नोव्हेंबरपासून गुलाबी थंडी जाण्यास सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसांत अनेक तरुणांनी ट्रेकिंगचा प्लान केलाय. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे सर्वचजण बाहेर पडलेत त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबईत फिरण्यासाठी सर्वोत्तम जागा

मुंबईतील सर्वात आकर्षणाची जागा म्हणजे येथे असलेले समुद्र किनारे आणि बीच. अनेक मुंबईकर या समुद्र किनाऱ्यांवर फिरण्याचा प्लान करतात. मुंबईत फिरण्यासाठी ठिकाण शोधत असाल तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालाही आवश्य भेट द्यावी. मुंबईत सिद्धीविनायक आणि मुंबा देवी मंदिर ही प्रसिद्ध ठिकाने आहेत. तुम्ही हाजी अली आणि नेहरू तारांगणलाही भेट देऊ शकता. वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, ग्लोबल विपश्यना पॅगोडा या ठिकाणी तुम्ही सुट्ट्यांमध्ये आवश्य भेट देऊ शकता.

Mumbai Pune Highway
Jalgaon Crime: दिवाळीच्या सुटीत परिवार बाहेर; बंद घरातुन एक लाखाच्या दागिन्यांची चोरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com