Sonakshi Sinha and Shatrughan Sinha Saam TV
मनोरंजन बातम्या

Sonakshi And Shatrughan Sinha: "ती तिच्या इच्छेनुसार लग्न करते...", सोनाक्षीच्या लग्नाला जाणार नसल्याच्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर सोडलं मौन

Shatrughan Sinha's Comment on Sonakshi Sinha's Wedding: अभिनेते शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा रंगली होती. आता या चर्चेवर शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल येत्या २३ जूनला लग्नगाठ बांधणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे कपल पर्सनल लाईफमुळे चर्चेत आले आहे. दोघांच्याही घरी जरीही लगीनघाई सुरू असली तरीही सोनाक्षी सिन्हाचे कुटुंबीय सोनाक्षी आणि जहीर यांच्या लग्नाबद्दल नाराज आहेत. सोनाक्षीचा भाऊ लव्ह आणि तिच्या आईने अभिनेत्रीला काल इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्याचीही चर्चा होत आहे. अशातच सोनाक्षीचे वडील आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा रंगली आहे. होत असलेल्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हाने सांगितले की, "मला सांगा, नेमकं आयुष्य कोणाचं आहे ? सोनाक्षी माझी एकुलती एक लेक आहे. माझ्या लाडक्या लेकीचं हे आयुष्य आहे. मला तिचा खूप अभिमान असून मी तिच्यावर प्रचंड प्रेम करतो. ती मला तिच्या आयुष्यातील भक्कम आधारस्तंभ समजते. मी नक्कीच माझ्या लेकीच्या लग्नाला उपस्थित राहणार आहे. मी नेहमीच तिच्या आनंदात सहभागी होतो, तिचा आनंद तोच माझाही आनंद... तिला तिचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती तिच्या इच्छेनुसार लग्न करू शकते."

शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलाखतीमध्ये पुन्हा सांगितले की, "मी दिल्लीत माझ्या राजकीय कामांसाठी आहे. मी मुंबईमध्ये फक्त तिची (सोनाक्षी सिन्हाची) ताकद म्हणून नाही तर तिचं सुरक्षाकवच म्हणून मुंबईमध्ये आहे. सोनाक्षी आणि झहीरला एकत्र राहायचे आहे, ते एकत्र छान दिसतात. अनेक जण खोटी माहिती पसरवत आहेत, कृपया खोटी माहिती पसरवणे थांबवा."

दरम्यान, सोनाक्षी आणि जहीर येत्या २३ जूनला लग्नगाठ बांधणार आहेत. मुंबईत अगदी मोजक्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत ते विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नासाठी दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मोजकेच मित्र उपस्थित राहणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, २० जूनला (गुरूवारी) सोनाक्षी आणि जहीरचा हळदी समारंभ पार पडणार आहे. सोनाक्षीने काही बॉलिवूड सेलिब्रिटींना लग्नाचं आमंत्रण दिले असून 'हिरामंडी' सीरीजच्या सेलिब्रिटींनाही तिने लग्नाचे आमंत्रण दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

SCROLL FOR NEXT