Chhaava Movie SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Movie : डोळ्यात द्वेष अन् मनात आग, 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता, फर्स्ट लूक पाहिलात का?

Akshaye Khanna : विकी कौशलचा 'छावा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील औरंगजेबाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरकूल अभिनेता पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

आता लवकरच विकी कौशलचा 'छावा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात खूप तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'छावा' या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्याची गाथा पाहायला मिळणार आहे. 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटात विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारणार आहे. या दोघांच्याही चित्रपटातील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतेच औरंगजेबाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. औरंगजेबाचा फर्स्ट लूकमध्ये बॉलिवूडचा सुपरकूल अभिनेता पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने (Akshaye Khanna) साकारली आहे. औरंगजेबाच्या पोस्टरमध्ये अक्षय खन्ना झळकत आहे. डोळ्यात द्वेष आणि मनात आग असा लूक त्याचा पोस्टरमध्ये दिसत आहे. चाहते आता अक्षय खन्ना अभिनय पाहण्यासाठी खूप आतुर झाले आहेत.

अक्षय खन्ना औरंगजेबाच्या लूकमध्ये खूप खूंखार अवतारात दिसत आहे. पांढरी दाढी, केस आणि डोक्यावर शाही मुकुटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अक्षय खन्नाच्या या पोस्टरला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. त्यांनी लिहिलं की, "डर और देहशत का नया चेहरा - मुघल शहेनशाह औरंगजेब, अक्षय खन्ना सादर करत आहे" या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

विकी कौशलचा 'छावा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आज (22 जानेवारी)ला रिलीज होणार आहे. तर 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छावा'या चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच चित्रपटात संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT