Famous Actor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor : "माझ्या पत्नीने माझ्यासोबत एका बेडवर झोपायला नकार दिला..."; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, नेमकं कारण काय?

Akshay Oberoi Wife Refused To Share Bed With Him : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाला की, "माझ्या पत्नीने माझ्यासोबत एका बेडवर झोपायला नकार दिला..."

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता अक्षय ओबेरॉय सध्या 'टॉक्सिक' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अक्षय ओबेरॉयने आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. एका मिडिया मुलाखतीत अक्षय ओबेरॉयने त्याच्या 'फ्लेश' वेब सीरिजमुळे व्यक्तिगत आयुष्यावर झालेल्या परिणामाबद्दल खुलासा केला. 'फ्लेश' मध्ये अक्षय ओबेरॉयने ताजची भूमिका केली. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री स्वरा भास्करही होती.

अक्षय ओबेरॉयने 2020 साली रिलीज झालेल्या 'फ्लेश' (Flesh) या वेब सीरिजमध्ये काम केले होते. ही क्राईम थ्रिलर वेब सीरिज फ्लेश दानिश अस्लम यांनी दिग्दर्शित केली होती. हा शो सिद्धार्थ आनंदने तयार केला होता, त्याची पटकथा पूजा लढा सुर्तीने लिहिली आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृ्त्तानुसार, अक्षय ओबेरॉयने मुलाखतीत सांगितले की, "मी 'फ्लेश' वेब सीरिजमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. ती माझ्या आवडत्या भूमिकांपैकी एक आहे. एक असा व्यक्ती जो स्त्रियांचे कपडे परिधान करतो आणि देहविक्रीच्या व्यवसायाचा मालक आहे. तो अत्यंत क्रूर आणि खतरनाक माणूस होता..."

पुढे अक्षय म्हणाला की, "तो शो पाहिल्यानंतर अनेक आठवडे माझ्या पत्नीने माझ्यासोबत एकाच बेडवर झोपण्यास नकार दिला होता. तो पाहणे खूप कठीण आहे. पण तो एक अतिशय चांगला शो होता. बऱ्याच लोकांनी तो पाहिला नाही..." या शो ला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले.

आगामी प्रोजेक्ट

अक्षय ओबेरॉय लवकरच शाहरुख खानसोबत 'किंग' चित्रपटात दिसणार आहे. 'किंग'चे चित्रीकरण सध्या दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन येथे सुरू आहे. तसेच यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटातही अक्षय झळकणार आहे. या चित्रपटात नयनतारा, कियारा अडवाणी आणि तारा सुतारिया या अभिनेत्रीही आहेत. अक्षय ओबेरॉयने २०२४ मध्ये रिलीज झालेल्या 'फायटर' चित्रपटातही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळंल

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT