Sky Force Office SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sky Force Collection : 'स्काय फोर्स'ची पहिल्या दिवशी उंच भरारी, कलेक्शनचा आकडा किती?

Sky Force Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडच्या खिलाडीचा नवीन चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar ) आणि वीर पहारियाचा 'स्काय फोर्स' (Sky Force ) चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. अक्षय कुमारचा 2025 मधील हा पहिला चित्रपट आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटातून वीर पहारिया याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जात आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा वीर पहारिया (Veer Pahariya ) नातू आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटाला पार्श्वभूमी देशभक्ती आहे. भारत-पाकिस्तान हल्ल्याची कथा यात सांगण्यात आली आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटात बॉलिवूडचा फायटर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान देखील आहे.

'स्काय फोर्स' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

'स्काय फोर्स' हा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी (Box Office Collection Day 1) 11.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अक्षय कुमारसोबतच वीर पहारियानेही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'स्काय फोर्स' हा चित्रपट 160 कोटींच्या बजेटमध्ये बनवा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.'स्काय फोर्स' वीकेंडला किती कमाई करतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'स्काय फोर्स'मध्ये अक्षय कुमारसोबत वीर पहाडिया, सारा अली खान, आणि निरमत कौर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'स्काय फोर्स' हा ॲक्शन चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT