Madhuri Dixit : 'धक धक गर्ल'चा आयकॉनिक गाण्यावर जबरदस्त डान्स, VIDEO पाहून पुन्हा पडला प्रेमात

Madhuri Dixit Dance Video : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' कायमच आपल्या कामामुळे चर्चेत असते. तिच्या स्टाइलचे लाखो चाहते दिवाने आहेत. सध्या माधुरी दीक्षितचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Madhuri Dixit Dance Video
Madhuri DixitSAAM TV
Published On

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' कायमच आपल्या लूक आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. तसेच मोठ्या अभिनेत्यांसोबत काम देखील केले आहे. माधुरी दीक्षित आजही बॉलिवूड गाजवत आहे. अलिकडेच ती 'भूल भुलैया 3'मध्ये पाहायला मिळाली होती. माधुरी दीक्षितही (Madhuri Dixit) एक उत्तम डान्सर देखील आहे. ती कायमच आपल्या नृत्याने चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या माधुरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माधुरी दीक्षितचा एका पार्टीतील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे. माधुरी दीक्षितने 2002 साली प्रदर्शित झालेल्या 'देवदास' चित्रपटातील एका गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. 'देवदास' चित्रपट 12 जुलै 2002 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'देवदास' चित्रपटातील आयकॉनिक गाणे 'डोला रे डोला' यावर सुंदर डान्स केला आहे.

22 वर्षानंतरही माधुरी दीक्षितच्या डान्समध्ये तोच उत्साह पाहायला मिळत आहे. माधुरीने एका पार्टीमध्ये हा भन्नाट डान्स केला आहे. आज 57 वर्षांची होऊनही माधुरी दीक्षित खूप सुंदर, हिट दिसत आहे. तिच्या डान्समध्ये एनर्जी पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्याचे भाव आजही तसेच दिसत आहे. व्हिडीओमध्ये माधुरी वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे ' सीरिजचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे कलाकारांनी खास व्रॅपअप पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत 'धकधक गर्ल' ने 'डोला रे डोला' या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. माधुरी दीक्षितच्या डान्समधील दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहे. या वयातही एवढा उत्साह पाहून चाहते माधुरी दीक्षितचे कौतुक करत आहेत.

माधुरी दीक्षितचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. माधुरी दीक्षितचे दिल तो पागल हैं, हम आपके हैं कौन, खलनायक हे चित्रपट खूप गाजले आहेत. माधुरी दीक्षितने हिंदीसोबत मराठी चित्रपटात देखील काम केले आहे.

Madhuri Dixit Dance Video
Sara Ali Khan and Arjun Pratap Bajwa: अर्जुन प्रताप बाजवा करतोय का सारा अली खानला डेट?; अफेअरबद्दल म्हणाला, 'सोशल मिडीयावर...'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com