Sara Ali Khan and Arjun Pratap Bajwa: अर्जुन प्रताप बाजवा करतोय का सारा अली खानला डेट?; अफेअरबद्दल म्हणाला, 'सोशल मिडीयावर...'

Sara Ali Khan and Arjun Pratap Bajwa Dating: अभिनेता अर्जुन प्रताप याने सारा अली खानसोबतच्या अफेअरच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षी केदारनाथमध्ये अर्जुन आणि सारा एकत्र दिसले होते.
Sara Ali Khan and Arjun Pratap Bajwa Dating
Sara Ali Khan and Arjun Pratap Bajwa DatingGoogle
Published On

Sara Ali Khan and Arjun Pratap Bajwa: मागील एका वर्षापासून अभिनेत्री सारा अली खानचे नाव अभिनेता अर्जुन प्रताप बाजवासोबत जोडले जात आहे. दोघेही केदारनाथमध्ये एकत्र दिसले होते आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून असे म्हटले जात आहे की सारा आणि अर्जुन प्रताप एकमेकांना डेट करत आहेत. पण आता अर्जुनने सारासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

ऑक्टोबर २०२४ मध्ये केदारनाथमधून अर्जुन आणि साराचे फोटो व्हायरल आले होते. यानंतर दोघेही राजस्थानमध्ये दिसले. दरम्यान, या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणचे त्यांचे फोटो शेअर केले. तेव्हापासून सारा आणि अर्जुन प्रताप रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अटकळ सुरू झाल्या.

Sara Ali Khan and Arjun Pratap Bajwa Dating
Urmila Kothare : 'मी पडून नाही राहिले'; अपघातातून वाचल्यानंतर उर्मिला अशी घेते स्वतःची काळजी!

सारासोबतच्या अफेअरच्या बातमीवर प्रतापने हे सांगितले

पण अर्जुनने एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, 'लोक सोशल मीडियावर लिहायचे ते लिहितील. ते त्यांचे काम आहे. मी फक्त स्वतःवर आणि मला काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे त्यांच्या कमेंटचा मला त्रास होत नाही.”

Sara Ali Khan and Arjun Pratap Bajwa Dating
KBC 16: केबीसीमध्ये झाली गडबड; अमिताभ बच्चन यांनी मागितली महिलेची माफी, वाचा सविस्तर

अर्जुन प्रताप बाजवा कोण आहे?

अर्जुन प्रताप बाजवा हा एक राजकारणी, मॉडेल आणि आता अभिनेता म्हणून काम करत आहे. तो एक गायक देखील आहे. अर्जुन प्रताप सध्या त्याच्या 'बँड ऑफ महाराजा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो ऑस्करसाठी नामांकित झाला आहे. अर्जुन हा एक एमएमए फायटर देखील आहे आणि तो अक्षय कुमारच्या 'सिंह इज ब्लिंग' चित्रपटातही दिसला आहे. अर्जुन हा राजकारणी फतेह जंग सिंग बाजवा यांचा मुलगा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com