Aayush Sharma Addresses Divorce Rumors with Wife Arpita Khan After 10-Year Marriage Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aayush Sharma On Divorce Rumours: सलमान खानच्या बहिणीचा मोडणार संसार?, आयुष शर्माने सांगितलं मोठं सत्य

Aayush Sharma Interview on Marriage With Arpita Khan: अर्पिता खान आणि आयुष शर्माने २०१४ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले आहे. कपलच्या लग्नाच्या १० वर्षानंतर घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चांदरम्यान आयुष शर्माने प्रतिक्रिया दिलेली आहे.

Chetan Bodke

अभिनेता सलमान खान अनेकदा फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत असतो. त्याची बहिण अर्पिता खानसोबतही अनेकदा फिरत असतो. अर्पिता खान आणि आयुष शर्माने २०१४ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाला यावर्षी १० वर्षे झाली आहेत. अशातच या कपलच्या लग्नाच्या १० वर्षानंतर घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे, सध्या सोशल मीडियावर भाईजानच्या बहिणीचा घटस्फोट होणार का ? अशी चर्चा होत आहे. नुकतंच अभिनेता आयुष शर्माने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटावर भाष्य केले आहे.

अर्पिता आणि आयुषच्या नात्यामध्ये काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयुषने सांगितले की, "मला एकदा पापाराझीने विचारलेलं की, तू अर्पितासोबत घटस्फोट घेतोय का? मी हा प्रश्न ऐकूणच हैराण झालो. आमच्या नात्याबद्दल अनेकजण अफवा पसरवत आहेत. मी माझ्या मुलासोबत डोसा खाण्यासाठी बाहेर गेलो होतो. माझ्या आणि अर्पिताच्या घटस्फोटाच्या रंगणाऱ्या चर्चांना पाहून मी हैराण झालो होतो. पण मी आणि पत्नी अर्पिता या अफवांवर पोट धरून हसलो."

आयुष पुढे मुलाखतीमध्ये म्हणाला, "मी घरी आल्यानंतर अर्पिताला विचारलं की, तू मला घटस्फोट देणार आहेस का? या अफवांवर आम्ही एकत्र बसून पोट धरून हसलो." असं म्हणत आयुषने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आयुषने सांगितले की, अर्पिता मला कायमच सपोर्ट करते. ती नेहमीच माझ्या पाठीशी खंबीर उभी असते. पण असं असलं तरीही ती माझ्यावर टीका करत असते. आयुष शर्मा शेवटचा ‘रुसलान’ चित्रपटात दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT