Ruchika Jadhav
घरच्या घरी डोसा बनवणे फार सोप्प आहे. मात्र सर्वच महिलांना परफेक्ट डोसा बनवता येत नाही.
डोसा बनवण्यासाठी तुम्ही ३ वाटी तांदुळ घ्या.
३ वाटी तांदुळ असतील तर त्यात एक वाटी उडिद डाळ घ्या.
डाळ आणि तांदुळ सकाळी पाण्यात भीजत ठेवा.
रात्री हे पाणी गाळून घ्या आणि याची बारीक पेस्ट बनवून घ्या.
तांदुळ आणि डाळ यांचं मिक्सरमध्ये बारीक मिश्रण करताना पाण्याचा जास्त वापर करू नका.
बारीक केलेलं मिश्रण रात्रभर फरमेट होऊ द्या.
सकाळी पॅनवर मस्त डोसे बनवा. यासोबत तुम्ही ओल्या नारळाची चटणी खाऊ शकता.