Aamir-Gauri SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aamir-Gauri : रिलेशनशिपबद्दल खुलासा केल्यानंतर आमिर अन् गौरी एकत्र स्पॉट, पाहा व्हायरल VIDEO

Aamir Khan-Gauri Spratt Spotted Together : बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान पहिल्यांदा गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत एकत्र स्पॉट झाला आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं व्हिडीओत काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने आपल्या वाढदिवसाला त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख सर्वांना करून दिली आणि आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले. यामुळे काही लोक आमिरला ट्रोल करत आहे. तर काही लोक त्याच्या निर्णयाचा आदर करत आहे. अशात आता रिलेशनशिपच्या खुलासा केल्यानंतर आमिर आणि त्याची गर्लफ्रेंड पहिल्यांदाच एकत्र स्पॉट झाली आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आमिर खानच्या गर्लफ्रेंडचे नाव गौरी स्प्रॅट आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आमिर आणि गौरी एकत्र पाहायला मिळत आहे. आमिर कार बाहेर गौरीची वाट पाहत आहे. गौरी आल्यानंतर दोघेही कारमध्ये बसून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये आमिर खानने निळ्या रंगाचा प्रिंटेड कुर्ता आणि ब्लॅक पॅन्ट परिधान केली आहे. तर गौरीने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता आणि राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. दोघेही एकत्र छान दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

कोण आहे गौरी स्प्रॅट?

गौरी स्प्रॅट (Gauri Spratt ) ही बंगळुरूची रहिवासी आहे. ती आमिर खानच्या प्रोडक्शन बॅनरखाली काम करते. गौरीची आई तामिळ तर वडील आयरिश आहेत. गौरी स्प्रंटला सहा वर्षांचा मुलगा देखील आहे. गौरीने ब्लू माउंटन स्कूलमधून शिक्षण घेतले असून 2004 मध्ये लंडनच्या कला विद्यापीठातून एफडीए स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा फॅशन कोर्स केला. गौरी स्प्रंट ही बंगळुरूमध्ये सलूनची मालकीण असलेल्या रीता स्प्रंट यांची मुलगी आहे. गौरी आता मुंबईत बीब्लंट सलून चालवत आहे.

आमिरचे वैयक्तिक आयुष्य

आमिर खानची याआधी दोन लग्न झाली आहेत. आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत झाले. त्यानंतर त्यांचा 2006 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर आमिर खाननेकिरण रावसोबत लग्न केले असून त्यांचा घटस्फोट 2021 मध्ये झाला. किरण रावसोबत घटस्फोटानंतर आमिर खान आता गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. सध्या सोशल मीडियावर आमिर आणि गौरीच्या लग्नची चर्चा पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT