Aamir Khan : शाहरुखचं झालं, तुझं झालं; आता सलमाननंही 'गौरी' शोधावी का? पापराझींच्या प्रश्नाचं उत्तर देताना काय म्हणाला आमिर खान?

Aamir Khan Salman Khan : शाहरुखला गौरी मिळाली, आता तुलाही तुझी गौरी मिळाली, सलमाननेही आता गौरी शोधावी का? असा प्रश्न आमिर खानला विचारण्यात आला. या प्रश्नाचे आमिरने काय उत्तर दिले? जाणून घ्या..
Aamir Salman Shahrukh
Aamir Salman ShahrukhSaam Tv
Published On

Aamir Khan Gauri : बॉलिवूड अभिनेता आमिर खान सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. आमिर वयाच्या ६० व्या वर्षी प्रेमात पडला आहे. वाढदिवसाच्या आधी त्याने आमिरने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा केला. त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव गौरी स्प्रॅट असे आहे. सध्या आमिर आणि गौरी यांच्या नात्याची सर्वत्र चर्चा होत आहे. अशातच आमिरने केलेल्या एका विधानाने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, आमिरने जेव्हा माध्यमांसोबत गौरीबाबतचा खुलासा केला तेव्हा त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याच दरम्यान 'बॉलिवूड सुपरस्टार्सपैकी शाहरुख खानला १९९१ मध्ये त्याची गौरी भेटली, आमिर खानलाही १८ महिन्यांपूर्वी त्याची गौरी भेटली, आता सलमान खानला..? असे एकाने म्हटले.

Aamir Salman Shahrukh
Pushpa 3 Rampage Release Date : कधी रिलीज होणार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 3'? निर्मात्यांनी थेट तारीखच सांगितली, म्हणाले..

त्यावर आमिर खान म्हणाला, 'आता सलमान खानला सुद्धा त्याची गौरी शोधायला हवी असचं ना..' त्यानंतर गमतीने 'गौरी शोधायला हवी पण.. सलमान आता काय शोधणार..' असे आमिरने म्हटले. सलमान खानला सेटल होण्यासाठी काय टिप्स द्याल? असा प्रश्न पापराझींनी आमिरला विचारला. त्यावर उत्तर देताना आमिरने 'सलमान तेच करणार जे त्याच्यासाठी योग्य आहे' असे उत्तर दिले.

Aamir Salman Shahrukh
दगाफटका करून जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

कोण आहे आमिर खानची गर्लफ्रेंड?

आमिर खानच्या नव्या गर्लफ्रेंडचे नाव गौरी स्प्रेट असे आहे. ती बंगळुरूमध्ये राहते. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये गौरी काम करते. ते दोघे एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात. १८ महिन्यांपूर्वी त्याच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. गौरीचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगा देखील आहे.

Aamir Salman Shahrukh
A R Rahman Wife : 'मला एक्स वाईफ..' ए.आर. रहमान यांच्या पत्नीचा मोठा खुलासा, 'वेगळे राहतो, पण आमचा घटस्फोट..'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com