Breaking News

Pushpa 3 Rampage Release Date : कधी रिलीज होणार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 3'? निर्मात्यांनी थेट तारीखच सांगितली, म्हणाले..

Pushpa 3 Rampage Release: मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात पुष्पा 2 प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. आता पुुष्पा 3 कधी प्रदर्शित होतोय याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Pushpa 3 Rampage Release Date
Pushpa 3 Rampage Release DateSaam Tv
Published On: 

Pushpa 3 Rampage : स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. पुष्पा 1 च्या तुलनेमध्ये पुष्पा 2 ने जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. आता अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना पुष्पा 3 चे वेध लागले आहे. अशातच निर्मात्यांनी पुष्पा ३-द रॅम्पेजची रिलीज डेट जाहीर केली. पुष्पा फ्रँचायझीमधला तिसरा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे? चला जाणून घेऊयात...

मागच्या वर्षी दिसेंबर महिन्यात पुष्पा 2-द रुल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर पुष्पाचा दरारा पाहायला मिळाला. या चित्रपटाने तब्बल 1,750 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. मागच्या वर्षातल्या ब्लॉकबास्टर चित्रपटांच्या यादीत पुष्पा-2 चे स्थान वरच्या स्थानावर आहे. दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांनी पुष्पा ३-द रॅम्पेजची रिलीज डेट जाहीर करुन चाहत्यांनी सरप्राईज दिले आहे.

Pushpa 3 Rampage Release Date
दगाफटका करून जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

निर्माता रविशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा 3 हा चित्रपट 2028 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्लू अर्जुन तमिळ दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहेत. दिग्दर्शक त्रिविक्रम यांच्या चित्रपटामध्येही अल्लू अर्जुन मुख्य पात्र साकारणार आहेत. अल्लू अर्जुनचे हे दोन चित्रपट पूर्ण व्हायला किमान दोन वर्ष जातील. त्याशिवाय पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार देखील त्यांच्या नव्या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत.

Pushpa 3 Rampage Release Date
Mohammed Shami : रंग उधळताय, शरीयतचा अनादर करताय.. लेकीने होळी खेळल्याने मोहम्मद शमीवर भडकले मौलाना

पुष्पा चित्रपटाचे संवादलेखक श्रीकांत विसा यांनी पुष्पा 3 बद्दल महत्त्वाची माहिती दिली. पुष्पा 3 हा चित्रपट मागील दोन्ही चित्रपटांच्या तुलनेमध्ये अधिक भव्यदिव्य असणार आहे. तिसऱ्या भागात नव्या व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत. पुष्पा 3 साठी बॉलिवूडच्या मोठ्या स्टारला कास्ट करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Pushpa 3 Rampage Release Date
औरंगाबाद नाही तर 'हे' होतं छत्रपती संभाजीनगरचं पूर्वीचं नाव, काय आहे इतिहास? वाचा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com