Mithun Chakraborty Birthday  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mithun Chakraborty Birthday : १८० फ्लॉप चित्रपट देऊनही प्रसिद्धी कायम, एकेकाळी नक्षलवादी असणाऱ्या मिथुन दादाचं कसा आहे फिल्मी प्रवास

Mithun Chakraborty Life Untold Story : मिथुन आज त्यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करत आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी १९७६ मध्ये चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दित फार स्ट्रगल केला आहे.

Chetan Bodke

मिथुन चक्रवर्ती हे भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. मिथुन आज त्यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करत आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी १९७६ मध्ये चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दित फार स्ट्रगल केला आहे. त्यांच्या स्ट्रगलच्या एक काळ असा होता जेव्हा ते कामासाठी दारोदार भटकायचे. आज आपण मिथुन चक्रवर्ती यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या करियरबद्दल जाणून घेऊया...

१६ जून १९५० रोजी मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म झाला आहे. त्यांचं खरं नाव मिथुन चक्रवर्ती नसून गौरांग चक्रवर्ती आहे. त्यांचा जन्म कोलकात्याच्या एका सर्व सामान्य कुटुंबात झालेला आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणतीही ओळख नसताना त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची प्रतिमा तयार केली.

मिथुन यांनी बॅचलर्स ऑफ सायन्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे येथून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर मिथुन नक्षलवादी गटात सामील होत नक्षलवादी झाले. एका नक्षल चळवळीत मिथून यांच्या भावाचा विजेचा झटका लागून त्यांचा मृत्यू झाला होता.

पूर्णपणे खचलेल्या अभिनेत्याला आपल्या कुटुंबाची फार काळजी वाटत होती. आपल्या कुटुंबाच्या काळजीपोटी अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत आपला हात आजमावण्याचा विचार केला होता.

एका मुलाखतीत मिथुन यांनी सांगितले की, "चित्रपट सतत फ्लॉप होत असल्यामुळे मी खूप चिंतेत होतो. त्यांना वाटायचं की मी आयुष्यात काहीही करू शकणार नाही. त्यामुळे अनेकदा त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार यायचा. मुंबईमध्ये मी खरोखरच फूटपाथवर राहिलो आहे. फुटपाथवर अनेक दिवस घालवल्यानंतर मी कधी गार्डन्समध्ये तर कधी हॉस्टेलसमोर झोपायचो. एवढेच नाही तर माझ्या अंघोळीची वैगेरे सोय व्हावी म्हणून माझ्या मित्राने मला माटुंगा जिमखान्याचे सदस्यत्वही दिले होते." जेव्हा मिथुन दा त्यांचा स्ट्रगलचा काळ आठवतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येतेच. मिथुनदा सहसा त्यांचा स्ट्रगल काळ कोणाला सांगत नाहीत.

८०-९० च्या दशकात फ्लॉप चित्रपट देणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत मिथुन दा यांच्या नावाचा समावेश होतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपल्या ४७ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी जवळपास १८० फ्लॉप चित्रपटांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर त्यांचे ३३ चित्रपट सतत फ्लॉप झाले. यानंतर ते खूप उदास झाले होते. पण त्यांची प्रसिद्धी इतकी होती की त्यांना १२ चित्रपट मिळाले. १९८२ मध्ये 'डिस्को डान्सर' या चित्रपटाने मिथुन दा यांचे आयुष्य बदलले. या चित्रपटाने त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळवून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT