Amruta Khanvilkar News : सुपरहिरो आणि माझी सुपर पॉवर माझे वडील, अमृता खानविलकर वडिलांविषयी भरभरून बोलली

Amruta Khanvilkar Fathers Day 2024 : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ही एका मुलाखतीमध्ये आपल्या वडिलांसोबतच्या काही आठवणी शेअर केलेल्या आहेत.
Amruta Khanvilkar News : सुपरहिरो आणि माझी सुपर पॉवर माझे वडील, अमृता खानविलकर वडिलांविषयी भरभरून बोलली
Amruta Khanvilkar Fathers Day 2024Saam Tv

प्रत्येकाच्या आयुष्यात आई- वडीलांसाठी विशेष स्थान असतं. वडील नेहमीच आपल्या परिवारासाठी दिवस रात्र मेहनत घेत आपल्या कुटुंबाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. वडीलांसाठी बोलू तितके शब्द अपूरे आहेत. याच वडीलांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे 'फादर्स डे'. जगभरात १६ जूनला 'फादर्स डे' साजरा केला जातो. सध्या सोशल मीडियावर अनेक युजर्स आपल्या वडीलांसोबतचा फोटो शेअर करत 'फादर्स डे'च्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. अशातच काही सेलिब्रिटीही वडीलांबद्दल पोस्ट शेअर करत 'फादर्स डे'च्या शुभेच्छा देत आहेत.

Amruta Khanvilkar News : सुपरहिरो आणि माझी सुपर पॉवर माझे वडील, अमृता खानविलकर वडिलांविषयी भरभरून बोलली
Shivali Parab Trolled : "पैसे आले की..."; शिवाली परब नव्या फॅशनवरून ट्रोल, नेटकऱ्यांनी केली कानउघडणी

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ही एका मुलाखतीमध्ये आपल्या वडिलांसोबतच्या काही आठवणी शेअर केलेल्या आहेत. अमृता खानविलकर मुलाखतीमध्ये वडिलांबद्दल म्हणाली की, " माझे वडील एक स्व-शिक्षित सकारात्मक व्यक्ती आहेत. ज्यांनी एकटं राहून आनंदी राहण्याची कला साध्य केली आहे. त्यांना प्रवासाची प्रचंड आवड आहे आणि एकटे राहूनही आनंद कसा मिळवायचा हे मी त्यांचा कडून शिकले आहे. या गोष्टीचं मला त्यांचं मुलगी म्हणून मला फार कौतुक वाटतं. बाबांकडून मी एक खूप खास गोष्ट शिकले ते म्हणजे आनंद हा मनातून येतो, एकटे राहण्याचा अर्थ एकटे असणे नाही."

"जेव्हा मी बाबांच्या वयात येईल तेव्हा त्यांच्यासारखा फक्त दोन टक्के आनंद मिळवू शकले तरी मी स्वतःला खूप नशीबवान समजेल. आपण सगळेच आपल्या आई-बाबां कडून अनेक गोष्टी शिकत असतो. एकटं असूनही आपण समाधानी आणि उत्साही कसे राहू शकतो हा धडा माझ्यासाठी अमूल्य आहे. मी तो माझ्या स्वतःच्या जीवनात समाविष्ट करते. त्यांच्या सारखं समाधान आणि आनंद जरीही मला मिळालं तरी मी स्वतःला खूप नशीबवान समजेल." अमृता कितीही शूट मध्ये व्यग्र असली तरीही ती अनेकदा फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री फॅमिलीसोबत फॉरेन टूर करून आली.

Amruta Khanvilkar News : सुपरहिरो आणि माझी सुपर पॉवर माझे वडील, अमृता खानविलकर वडिलांविषयी भरभरून बोलली
Chandu Champion Film : ‘चंदू चॅम्पियन’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीची जोरदार चर्चा, केलं कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं कौतुक

२०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटातून अमृता खानविलकरला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती. तिच्या अभिनयाचे आणि तिच्या डान्स फक्त देशातच नाही तर, जगभरामध्ये जोरदार कौतुक झाले. अमृता आगामी काळात अनेक हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्समध्ये दर्जेदार भूमिका करणार आहे. 'कलावती', 'ललिता बाबर', 'पठ्ठे बाबूराव' यासारख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार आहे. अमृता शेवटची 'लुटेरा' या वेबसीरीजमध्ये दिसली.

Amruta Khanvilkar News : सुपरहिरो आणि माझी सुपर पॉवर माझे वडील, अमृता खानविलकर वडिलांविषयी भरभरून बोलली
Tina Datta : टीना दत्ताच्या स्टायलिश लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा, अभिनेत्रीचं निखळ सौंदर्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com