Chandu Champion Film : ‘चंदू चॅम्पियन’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीची जोरदार चर्चा, केलं कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं कौतुक

Hemangi Kavi In Chandu Champion Film : सध्या कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत असून या चित्रपटामध्ये एक मराठमोळी अभिनेत्रीही दिसली आहे. तिने या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली.
Chandu Champion Film : ‘चंदू चॅम्पियन’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीची जोरदार चर्चा, केलं कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं कौतुक
Chandu Champion FilmSaam Tv

गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता कार्तिक आर्यन याच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. हा चित्रपट पॅरालिम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता कार्तिक आर्यन आहे. अशातच या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सुद्धा दिसणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. तिने चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने शुटिंग दरम्यानचा किस्सा शेअर केला आहे.

Chandu Champion Film : ‘चंदू चॅम्पियन’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीची जोरदार चर्चा, केलं कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं कौतुक
Ashok Saraf News : “शरद पवार माझे आवडते नेते, त्यांनी माझं काम तीन मिनिटांत केलं”; पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांनी सांगितला 'तो' किस्सा

हेमांगी कवीने पोस्टमध्ये लिहिलंय की, "पद्मश्री पुरस्कार विजेते पॅरालिम्पिक विजेते मुरलीकांत राजाराम पेटकर यांचा ‘चंदू चॅम्पियन’ हा बायोपिक अप्रतिम आहे. माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एका दिग्दर्शकानी ह्या चित्रपटाचे सुंदरपणे दिग्दर्शन केले आहे. अत्यंत प्रतिभावान, प्रचंड मेहनती, गुणी आणि ध्येयाप्रती एकाग्र असलेला कलाकार कार्तिक आर्यन ज्याने या चित्रपटात मुरलीकांत यांचे पात्र अगदी उत्तमपणे साकारले आहे. त्याच्यासोबत काम करणं ही अभिमानाची गोष्ट आहे." असं म्हणत हेमांगीने कार्तिकचं कौतुक केलं आहे. हेमांगीने चित्रपटामध्ये मुरलीकांत पेटकर यांच्या आईचे पात्र साकारले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी केली आहे. 'चंदू चॅम्पियन' हा पॅरालिम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांचा जीवनपट आहे. सैन्य अधिकारी असलेल्या मुरलीकांत पेटकर यांना १९६५ मध्ये झालेल्या भारत- पाक लढाईत अपंगत्व आले होते. त्यांनी या अपंगत्वावर मात करत पॅरालिम्पिक मध्ये तीन स्पर्धा प्रकारांमध्ये विजेतेपद मिळवलं. त्यांचा हा सगळा प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४.७५ कोटींची कमाई केलेली आहे.

Chandu Champion Film : ‘चंदू चॅम्पियन’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीची जोरदार चर्चा, केलं कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं कौतुक
Shashank Ketkar Video : शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMCची कारवाई, एका रात्रीत केला परिसर स्वच्छ; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...

हेमांगी कवीच्या कामाबद्दल बोलायचे तर, सध्या हेमांगी 'मॅडनेस मचाएंगे' या शोच्या माध्यमातून ती चाहत्यांचे मनोरंजन करीत आहे. त्यासोबतच 'कैसे मुझे तुम मिल गयी' या हिंदी मालिकेतूनही हेमांगी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. हेमांगी शेवटची 'तमाशा लाईव्ह' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सध्या हेमांगीला तिचा चाहतावर्ग मराठी चित्रपटामध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे.

Chandu Champion Film : ‘चंदू चॅम्पियन’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीची जोरदार चर्चा, केलं कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं कौतुक
Chandu Champion Collection : कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद; पहिल्या दिवशी किती गल्ला जमवला? जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com