Azam Khan Viral Video: 'आधी पोटोबा.. 'भारत- पाक सामन्यानंतर आझम खानची बर्गर पार्टी- Video व्हायरल

Azam Khan Eating Burger: भारत- पाकिस्तान सामन्यानंतर आझम खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Azam Khan Viral Video: 'आधी पोटोबा.. 'भारत- पाक सामन्यानंतर आझम खानची बर्गर पार्टी- Video व्हायरल
AZAM Khansaam tv news

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत पाकिस्तानने आतापर्यंत सुमार कामगिरी केली आहे. या संघातील खेळाडू आजम खानलाही त्याच्या फिटनेसमुळे आणि फलंदाजीमुळे जोरदार ट्रोल केलं जात आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केलं. दरम्यान पाकिस्तानचा तिसरा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी आजम खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आजम खान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. कधी फ्लॉप फलंदाजी, तर कधी फ्लॉप यष्टीरक्षण, नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असणारा आजम खान आता बर्गरमुळे चर्चेत आला आहे. त्याचा बर्गर खात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सामन्याआधीचा आहे, की सामन्यानंतरचा हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मात्र व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, पाकिस्तानचा संघ हरतोय आणि हा इथे बर्गर खाण्यात व्यस्त आहे. तो अमेरिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला होता. त्यामुळे त्याला भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातून बाहेर केलं गेलं होतं.

Azam Khan Viral Video: 'आधी पोटोबा.. 'भारत- पाक सामन्यानंतर आझम खानची बर्गर पार्टी- Video व्हायरल
IND vs PAK Cricket Fan: ट्रॅक्टर विकून भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट घेतलं; आता पश्चातापाची वेळ

आजम खानला सातत्याने संघात संधी दिली गेली मात्र त्याला या संधीचं सोनं करता आलं नाही. टी-२० वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या मालिकेतही तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. फलंदाजीत त्याला धावा करता आल्या नाहीत. यष्टीरक्षण करताना त्याला सोपे झेलही सोडले. त्यामुळेच नेटकऱ्यांनी त्याला जोरदार ट्रोल केलं आहे.

Azam Khan Viral Video: 'आधी पोटोबा.. 'भारत- पाक सामन्यानंतर आझम खानची बर्गर पार्टी- Video व्हायरल
IND vs PAK: 'त्याला बॅटींग तरी येते का?', पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर दिग्गज खेळाडू भडकले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com