Shashank Ketkar News : शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMCची कारवाई, एका रात्रीत केला परिसर स्वच्छ; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...
Shashank Ketkar Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shashank Ketkar Video : शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMCची कारवाई, एका रात्रीत केला परिसर स्वच्छ; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...

Chetan Bodke

मराठी टीव्ही अभिनेता शशांक केतकर ह्याला 'होणार सुन मी ह्या घरची' या मालिकेतून विशेष प्रसिद्धी मिळालेली आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिनही माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा शशांक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

शशांकने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत फिल्मसिटीच्या बाहेरील कचऱ्याची अवस्था दाखवली होती. साचलेल्या कचऱ्यामुळे त्याने महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली होती. ही तक्रार दाखल केल्यानंतर एका रात्रीतच कारवाई करण्यात आली आहे. मुंबई फिल्मसिटी बाहेरील कचऱ्याचा ढीग असलेली जागा स्वच्छ केली. याबाबत शशांकने इन्स्टा स्टोरी शेअर करत मुंबई महानगरपालिकेचे आभार मानले आहे.

अभिनेता शशांक केतकर अनेकदा सोशल मीडियावर सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत असतो. शशांकने इन्स्टा स्टोरीवर स्वच्छ केलेल्या जागेचा फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शन लिहिले की, “मुंबई महानगरपालिकेने तातडीनं कारवाई केली यासाठी मनापासून आभारी आहे. आता पुन्हा तिथे कचरा जमणार नाही यासाठी काहीतरी ठोस पावलं उचला आणि फक्त तो परिसर नाही तर पूर्ण मुंबई स्वच्छ ठेवूया. मुंबई महापालिके इतकीच नागरिकांचीही जबाबदारी आहे.” त्यानंतर अभिनेत्याने एक व्हिडीओही शेअर केलेला आहे.

Shashank Ketkar Post

अभिनेता शशांक केतकर कायमच इन्स्टाग्रामवर चर्चेत असतो. तो अनेकदा सोशल मीडियावर सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत असतो. शशांकने इन्स्टा स्टोरीवर स्वच्छ केलेल्या जागेचा फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शन लिहिले की, “मुंबई महानगरपालिकेने तातडीनं कारवाई केली यासाठी मनापासून आभारी आहे. आता पुन्हा तिथे कचरा जमणार नाही यासाठी काहीतरी ठोस पावलं उचला आणि फक्त तो परिसर नाही तर पूर्ण मुंबई स्वच्छ ठेवूया. मुंबई महापालिके इतकीच नागरिकांचीही जबाबदारी आहे.” त्यानंतर अभिनेत्याने एक व्हिडीओही शेअर केलेला आहे.

व्हिडीओमध्ये शशांक म्हणाला, "मला काल मुंबईच्या फिल्मसिटीच्या गेट जवळ बराच कचरा दिसला. तर त्याचा मी व्हिडीओ काढून लगेचच सोशल मीडियावर शेअर केला. माझ्या त्या व्हिडीओला नागरिकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. सध्या माझी ती पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे माझी तक्रार थेट महानगरपालिकेपर्यंत पोहोचली ही. महानगरपालिकेने एका रात्रीतच त्यावर कारवाई केली. कारवाई केल्यानंतर त्यांनी तात्काळ फोटो त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरही शेअर केलेला आहे. त्यामुळे जेव्हा आपण आवाज उठवतो तेव्हा त्याच्यावर लगेचच कारवाई केली जाते हे पाहून खूप वाटतंय."

Shashank Ketkar Video

व्हिडीओमध्ये पुढे शशांक म्हणाला, "महाराष्ट्रात, देशात कुठेही तुमच्या भागात जर असं काही घडतं असेल तुम्ही तुमचा आवाज उठवा तुम्ही तो तुमच्या महानगरपालिकेपर्यंत पोहोचवा. ते कारवाई करतात. ते सक्रिय असू शकतात. पण आता या कारवाईची खरंच गरज आहे." सध्या शशांक केतकर त्याच्या ह्या सामाजिक कार्यामुळे कमालीचा चर्चेत आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Driving Tips: मुसळधार पावसात गाडी चालवताना काय काळजी घ्याल?

VIDEO: ठाण्यात लोकलचा खोळंबा, रिक्षा स्थानकावर प्रवाशांची तुंडुंब गर्दी

Raigad Fort Closed: किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद! स्थानिक शाळांना सुट्टी जाहीर; ढगफुटीसदृश्य पावसानंतर प्रशासन अलर्ट

VIDEO: बाळासाहेब थोरातांच्या 'त्या' आरोपावर मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं प्रत्युत्तर

Mumbai Local Train : मोठी बातमी! धावत्या लोकलमधून महिला पडली, दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले; थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT