Kangana Ranaut saam tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut : बॉलिवूडने अश्लीलतेच्या मर्यादा ओलांडल्या, नोरा फतेही-संजय दत्तच्या गाण्यावर कंगना भडकल्या

Kangana Ranaut Reacts On Nora Fatehi Song : नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्या अश्लील गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. तिने कडक शब्दात बॉलिवूडला फटकारले असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Shreya Maskar

नोरा फतेही आणि संजद दत्त यांच्या 'सरके चुनर तेरी सरके' गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

नोराच्या 'सरके चुनर तेरी सरके' गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

नोरा फतेहीच्या या गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बादशाह नंतर आता नोरा फतेही आपल्या गाण्यामुळे चांगली चर्चेत आली आहे. नोरा फतेही आणि संजद दत्त यांच्या 'केडी - द डेव्हिल' चित्रपटातील 'सरके चुनर तेरी सरके' गाण्यावर बंदी घालण्याची मागली केली आहे. या गाण्यात अश्लील शब्द तसेच अश्लील डान्स स्टेप्स पाहायला मिळत आहेत.गाण्याच्या लिरिक्समध्ये असभ्यता दिसत असून घाणेरड्या स्टेप्स बसवल्या आहेत. ज्यामुळे गाणे खूपच अश्लील झाले आहे. यावर प्रेक्षक प्रचंड संताप व्यक्त करत आहे. अशात आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांनी या प्रकरणावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया देऊन, बॉलिवूडला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

कंगना रणौत नेमकं काय म्हणाल्या?

नोरा फतेहीच्या गाण्यावरून निर्माण झालेल्या वादावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत म्हणाल्या, " अश्लीलता, घाणेरडे PR डावपेच आणि प्रसिद्धीसाठी बॉलिवूडने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. संपूर्ण देश त्यांचा निषेध करत आहे, त्यांना धारेवर धरत आहे. मला वाटत नाही की, त्यांना कसलीही लाज उरली आहे. अशा प्रकारची अश्लीलता दाखवणाऱ्याच्या विरोधात आणखी कडक भूमिका घेण्याची गरज आहे. कुटुंबासोबत टिव्ही पाहणे आता कठीण झाले आहे. बॉलिवूडवर आता कडक लगाम घालावी लागेल..."

तक्रार दाखल

'एएनआय'च्या रिपोर्टनुसार, वकील विनीत जिंदाल यांनी नोरा फतेहीच्या गाण्याच्या प्रकरणात 'केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे' (CBFC) धाव घेत, 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. या गाण्याचे बोल आणि दृश्ये अश्लील असून, विशेषतः अल्पवयीन मुलांसाठी ते हानिकारक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या गाण्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

'एएनआय'च्या माहितीनुसार, तक्रारदाराचा असा आरोप आहे की, "हे गाणे युट्यूबवर प्रदर्शित झाले असून ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या गाण्यामध्ये अत्यंत अश्लील, घाणेरडी, बीभत्स अभिव्यक्तींचा समावेश आहे. या गाण्याचे चित्रीकरण आणि नृत्याचे प्रसंग अश्लीलतेला खतपाणी घालते ज्यामुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग होतो. जेव्हा अशा प्रकारचे कंटेंट ऑनलाइन उपलब्ध असतात, तेव्हा मुलं लहान वयात अयोग्य माहितीच्या संपर्कात येतात. "

'सरके चुनर तेरी सरके' गाण्याचे संगीत दिग्दर्शक अर्जुन जान्या आहेत. गीत रकीब आलम यांनी लिहिले आहे आणि हे गाणे गायक मंगली यांनी गायले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रेम यांनी केले आहे. चित्रपटात ध्रुव सरजा, शिल्पा शेट्टी, संजय दत्त, व्ही. रविचंद्रन आणि नोरा फतेही यांच्यासह कलाकार झळकणार आहेत. हे गाणे पाहताच नेटकऱ्यांचा संताप उडाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT