HBD Shah Rukh Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

HBD Shah Rukh Khan : परदेशात बंगले अन् लग्जरी कार; बॉलिवूडचा 'किंग' कोट्यावधींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

Shah Rukh Khan Net Worth : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. तो एक लग्जरी आयुष्य जगत आहे. त्याच्या एकूण संपत्तीचा आकडा जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आज बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 60 वा वाढदिवस आहे.

शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार्सच्या गटात येतो.

शाहरुख खान लवकरच 'किंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आज (2 नोव्हेंबर) किंग खान (Shah Rukh Khan) चा वाढदिवस आहे. शाहरुख खान आज 60 वर्षांचा झाला आहे. शाहरुख खानने आपल्या दमदार अभिनयाने लाखो - करोडो प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. त्याला इंडस्ट्रीत बॉलिवूडचा बादशाह म्हणूनही ओळखले जाते. शाहरुख खान 1991 मध्ये गौरी खानशी लग्नगाठ बांधली. शाहरुख खानला आर्यन, सुहाना आणि अबराम खान अशी तीन मुलं आहेत. तो एक लग्जरी आयुष्य जगत आहे. त्याची एकूण संपत्ती जाणून घेऊयात.

1992 साली रिलीज झालेल्या 'दीवाना' चित्रपटातून शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शाहरुख खानला 2025 साली 'जवान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शाहरुख खान आता लवकरच 'किंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'किंग' हा ॲक्शन चित्रपट आहे. 'किंग'मध्ये शाहरुख खानसोबत त्याची लेक सुहाना खान देखील झळकणार आहे. 'किंग' 2027 ला प्रदर्शित होणार असल्याचे बोले जात आहे. अलिकडेच शाहरुख खान लेक आर्यन खानचा चित्रपट 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' मध्ये देखील झळकला होता.

शाहरुख खान नेटवर्थ

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानची एकूण संपत्ती 12,490 करोड रुपये आहे. शाहरुख खान रेड चिलीज एंटरटेनमेंट कंपनीतून बक्कळ पैसा कमावतो. कंपनीची स्थापना 2002 साली झाली. तसेच शाहरुख रियल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतो. एका पाठोपाठ सुपरहिट चित्रपट करतो. शाहरुख खानचा मुंबई वांद्रे येथील बंगला 'मन्नत' जवळपास 200 कोटी रुपयांचा आहे. यासोबतच शाहरुख खानकडे अनेक मालमत्ता आहेत. शाहरुखचा दुबईतील व्हिला आहे. अलिबागमध्ये आलिशान फार्महाऊस आहे. लंडनमधील पार्क लेन परिसरात त्याचे आलिशान घर आहे.

किंग खानकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. यात बुगाटी, रोल्स-रॉयस, मर्सिडीज, ऑडी, बीएमडब्ल्यू, जीटी यांसारख्या ब्रँडच्या लग्जरी कार आहेत. शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार्सच्या गटात येतो. शाहरुख खान एका चित्रपटासाठी जवळपास 150 ते 250 कोटी रुपये मानधन घेतो. तर शाहरुख खान एका जाहिरातीसाठी 5-10 कोटी रुपये घेतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी

Famous Singer : मुलगा झाला हो! मराठमोळी गायिका झाली आई, पाहा PHOTOS

Happy Hormones कसे वाढवायचे? खाण्यात या ४ पदार्थांचा करा समावेश

निवडणुका लागताच भाजपला धक्का; दिग्गजांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

वादळाचा तडाखा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT