HBD Amitabh Bachchan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

HBD Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन की धर्मेंद्र सर्वात जास्त श्रीमंत कोण? पाहा जय-वीरूच्या संपत्तीचा आकडा

Amitabh Bachchan vs Dharmendra Net Worth : बॉलिवूडची सुपरहिट जोडी जय-वीरू म्हणजे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती जाणून घेऊयात. कोण जास्त श्रीमंत पाहा.

Shreya Maskar

आज (11 ऑक्टोबर)ला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे.

अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र जय-वीरू म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे.

अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र दोघेही कोटीवधींचे मालक आहेत.

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज (11 ऑक्टोबर) 83 वर्षांचे झाले आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपट केले. त्यांचा 'शोले' चित्रपट खूप गाजला. 'शोले'मुळे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र (Dharmendra ) यांची जोडी सुपरहिट झाली.

1975 मध्ये शोले (Sholay) चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र हे दोन्ह सुपरस्टार मुख्य भूमिकेत होते. चित्रपट खूप गाजला. त्यासोबत चित्रपटातील जय-वीरूची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. 'शोले' चित्रपटापासून अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांना जय-वीरू या नावाने ओळखले जाते.

अमिताभ बच्चन यांचे नेटवर्थ

मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 1,630 कोटी रुपयांच्या वर आहे. अमिताभ बच्चन यांनी 'कल्की 2898'साठी तब्बल 20 कोटी रुपये मानधन घेतले होते. तर कौन बनेगा करोडपती (केबीसी) च्या एका एपिसोडसाठी ते 5 कोटी रुपये फी घेतात. त्यांच्याकडे रोल्स-रॉयस, बीएमडब्ल्यू, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, रेंज रोव्हर आणि पोर्श केमन यासारख्या लग्जरी कार आहेत. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.

अमिताभ बच्चन यांनी 1969 मध्ये रिलीज झालेल्या 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अमिताभ बच्चन चित्रपट, होस्टिंग, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक , जाहिरातीतून पैसे कमावतात. अमिताभ बच्चन यांचे मुंबईत 'जलसा', 'प्रतीक्षा' आणि 'जनक' हे तीन बंगले आहेत. त्यांनी यापूर्वी अयोध्येतही कोट्यावधींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. नुकतेच बिग बींनी मुंबईजवळील अलिबागमध्ये तीन आलिशान प्लॉट खरेदी केली आहे. ज्याची किंमत तब्ब्ल 6.59 कोटी रुपये आहे.

धर्मेंद्र नेटवर्थ

मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांच्याकडे जवळपास 450 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याचे लोणावळ्यात 100 कोटी रुपयांचे फार्महाऊस आहे. धर्मेंद्र यांचे मुंबईत जुहू येथे आलिशान घर आहे. 1960 मध्ये रिलीज झालेल्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अलिकडेच त्यांनी 'रॉकी ​​और रानी की प्रेम कहानी' आणि 'तेरी बातें में ऐसा उलझा जिया' चित्रपटात काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अ‍ॅक्टिव मोडमध्ये

Singer Died: प्रसिद्ध गायकाचे ३५ व्या वर्षी निधन, संगीत विश्वावर शोककळा

Skin Care Tips: ग्लोइंग स्कीनसाठी 'हे' ज्यूस ठरतील फायदेशीर, चेहऱ्यावर त्वरीत दिसेल फरक

रस्त्यावर वाढदिवस, हातात तलवार...थेट कायद्याला आव्हान|VIDEO

Flight Ticket: महागाईचा पहिला फटाका फुटला; ऐन दिवाळीत विमान तिकीट महागलं; वाचा कितीने वाढलं भाडं?

SCROLL FOR NEXT