Bollywood Item Girls: इंडस्ट्रीतील सर्वात महागडी आयटम गर्ल कोण? एका गाण्यासाठी नायिकांपेक्षा जास्त मानधन

Most Expensive Item Girls: चित्रपटातील रोमँटिक सीनसह आयटम नंबरही प्रेक्षकांना आवडतात. प्रदर्शित होण्याआधीच हे गाणी चाहत्यांना आकर्षित करतात. काही अभिनेत्री या सॉंगसाठी मुख्य कलाकारांपेक्षा जास्त फी घेतात; टॉप महिला स्टार्स पाहूया.
Bollywood Item Girls: इंडस्ट्रीतील सर्वात महागडी आयटम गर्ल कोण? एका गाण्यासाठी नायिकांपेक्षा जास्त मानधन
Published On

सर्वात जास्त मानधन घेणारी आयटम गर्ल्स

चाहते चित्रपटांमध्ये आयटम नंबरला प्रचंड पसंती देतात. ज्यामुळे चित्रपटांवर मोठी मागणी निर्माण होते. प्रदर्शित होण्याआधीच हे गाणी सोशल मीडियावर हिट होतात. काही अभिनेत्री या आयटम नंबरसाठी निर्मात्यांकडून मोठ्या रकमेची फी घेतात. चला पाहूया टॉप अभिनेत्री किती फी मिळवतात.

तमन्ना भाटिया

आयटम गर्ल्सबद्दलमध्ये तमन्ना भाटियाचे नाव न घेणं हे तर चालणार नाही. ती आयटम सॉंगमध्ये खूप लोकप्रिय आहे. "रेड २" चित्रपटातील आयटम सॉंगसाठी तिने अंदाजे १ ते २ कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे.

करिना कपूर

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने अनेक लोकप्रिय आयटम सॉंग्स सादर केले आहेत. जसे फेविकॉल से, हलकट जवानी आणि छम्मक छल्लो. माहितीनुसार, करीना कपूरने एका आयटम सॉंगसाठी तब्बल ₹५ कोटी रुपये मानधन घेतल्याचे समोर आले आहे.

समांथा रुथ प्रभू

अभिनेत्री समांथा रूथ प्रभूची ओळख तुम्हाला असलेलाच असेल. तिने "पुष्पा: द राइज" चित्रपटातील "ऊ अंटावा" गाण्यावर जबरदस्त नृत्य सादर केले. ज्यामुळे प्रेक्षक तिच्या डान्सवर अधिक फिदा झाले. समांथाने या सॉंगसाठी तब्बल ₹५ कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सनी लिओनी

या यादीत अभिनेत्री सनी लिओनचा समावेशही आहे. तिच्या सौंदर्यामुळे ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. सनीने बेबी डॉल, देसी लूक आणि लैला मैं लैला यांसारख्या अनेक आयटम सॉंग्समध्ये नृत्य केले आहे. माहितीनुसार, तिने एका आयटम सॉंगसाठी तब्बल ₹३ कोटी रुपये मानधन घेतल्याचे समोर आले आहे.

मलायका अरोरा

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे आयटम सॉंग प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. तिचे गाणी वाजताच चाहते त्यावर नाचायला लागतात. मलायकाने "अनारकली" आणि "मुन्नी बदनाम"सह अनेक हिट आयटम सॉंग्समध्ये नृत्य केले आहे. माहितीनुसार, ती एका आयटम सॉंगसाठी अंदाजे १ ते २ कोटी रुपये मानधन घेते.

नोरा फतेही

अभिनेत्री नोरा फतेहीची ओळख आज सर्वांनाच आहे. तिच्या जबरदस्त नृत्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सोशल मीडियावर तिचा फॅन बेस खूप मोठा आहे. माहितीनुसार, नोरा एका आयटम सॉंगसाठी तब्बल ₹२ कोटी रुपये मानधन घेतल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com