Baseer Ali 
मनोरंजन बातम्या

Baseer Ali: 'मला एकटं सोड मी कंटाळलोय...'; बिग बॉसनंतर बसीरचे बदलले रंग, नेहलसोबत संपवलं नातं

Baseer Ali: बिग बॉसच्या घरात बसीर अली आणि नेहल चुडासामा एकमेकांच्या खूप जवळ होते, पण घराबाहेर पडल्यानंतर त्यांचे नाते बदललेले दिसते.

Shruti Vilas Kadam

Baseer Ali: बिग बॉस १९ संपला असून गौरवने बिग बॉस १९ची ट्रॉफी उचलली आहे. पण, बिग बॉस १९ मधील काही स्पर्धकांना अचानक बाहेर काढण्यात आले होते. यामध्ये बसीर अलीचा समावेश होता. बिग बॉसच्या घरात जवळजवळ प्रत्येक मुद्द्यावर बसीर नेहमीच आपले मत मांडत आणि सलमान खानने स्वतः अनेक वेळा त्याचे कौतुक केले होते. चाहत्यांनी पाठिंबा दिला होता, पण अचानक एके दिवशी बसीरला बाहेर काढण्यात आले. बाहेर काढण्यात आल्यानंतर असे म्हटले जात होते की लोकांना बसीर आणि नेहल यांची प्रेमकहाणी खोटी वाटली, म्हणूनच त्यांनी त्याला मत कमी मिळाले.

"मला एकटं सोड मी कंटाळलोय तुला''

बाहेर काढल्यानंतर, बसीर आणि नेहलच्या नात्यात अनेक चढ-उतार आले, परंतु शेवटी ते वेगळे झाले. अलिकडेच एका मुलाखतीत बसीर म्हणाला, "मला एकटं सोडा" पापाराझींना उत्तर देताना बसीर म्हणाला की त्याचे नाव नेहलशी जोडल्याने तो कंटाळला आहे. अभिनेता म्हणाला, "मी सर्व क्लिप्स पाहून कंटाळलो आहे."

"मित्र म्हणून राहायचे नाही"

बसीर अलीने माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिले, "मला आता तिच्यासोबत मित्र म्हणून राहायचे नाही. 'इमॅच्योर' हा शब्द ऐकून मी कंटाळलो आहे. मला आता मित्र राहायचे नाही... जा तुझं आयुष्य जग... माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहा... माझे चाहतेही कंटाळले आहेत." नेहलला पुढे जाण्याचा सल्ला देताना बसीर म्हणाले, "इतका द्वेष... आयुष्यात पुढे जा. मला फक्त तिने माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहावे असे वाटते. ती जिथे जाते तिथे ती माझे नाव वापरत असते आणि तीच गोष्ट वारंवार सांगत असते."

"स्वतःवर काम कर, बिग बॉस संपला"

बसीर आणि नेहलमधील रिलेशनशिप फेक होते असे प्रेक्षकांना दिसून आले त्यामुळे प्रेक्षक बिग बॉसच्या मताशी सहमत आहेत. कारण कदाचित शोमधील त्यांचे नाते खरे नव्हते. ते फक्त प्रेक्षकांची मते मिळविण्यासाठी प्रेमाचे ढोंग करत होते. यावर बसीर अली म्हणाला, "पुन्हा पुन्हा बसीर बसीर. स्वतःबद्दल काहीतरी कर आता बिग बॉस संपला आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हाताने उखडला डांबरी रस्ता, ग्रामस्थांचा ठेकेदाराविरोधात संताप

SCROLL FOR NEXT