Border 2: सनी देओलकडे आधीच अनेक मोठे चित्रपट आहेत. त्याने त्यापैकी काहींवर काम पूर्ण केले आहे, तर काहींबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. त्याचा "जाट" हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता, परंतु तो बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नाही. आता २०२६ च्या सुरुवातीला सनी देओल पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. त्याचा "बॉर्डर २" हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्माते लवकरच चित्रपटाचे प्रमोशन सुरू करतील. पण त्याआधी, चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन निर्मात्यांनी या चित्रपटाच्या टीझरची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.
सनी देओल "बॉर्डर २" च्या टीममध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी त्यांच्याआकर्षक लूकमध्ये दिसत आहेत. चित्रपटातील तिघांचे फर्स्ट लूक देखील समोर आले आहेत. हे सर्वजण पहिल्यांदाच एकाच पोस्टरमध्ये एकत्र दिसले आहेत. या पोस्टर सह निर्मात्यांनी नविन माहिती शेअर केली आहे.
'बॉर्डर २' चा टीझर कधी प्रदर्शित होणार?
टी-सीरीजने अलीकडेच एक पोस्टर शेअर केला आहे यामध्ये लिहिले आहे, "विजय दिवसाचा उत्साह, १९७१ च्या विजयाची आठवण आणि वर्षातील सर्वात भव्य टीझर लाँच - हे सर्व एकत्र. 'बॉर्डर २' चा टीझर १६ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजता प्रदर्शित होईल." नवीन पोस्टरमध्ये सनी देओल मुख्य आहेत, त्यानंतर वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि शेवटी अहान शेट्टी आहेत. या सर्वांच्या चेहऱ्यावर जखमा आहेत, परंतु त्यांच्या डोळ्यात लढाऊ वृत्ती असल्याचे दिसून येते.
'बॉर्डर' ने किती कमाई केली?
१९९७ मध्ये, जेव्हा 'बॉर्डर' प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पी. दत्ता यांनी दिग्दर्शित केला होता. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान घडलेला हा चित्रपट लोंगेवालाच्या लढाईवर आधारित आहे. सनी देओल व्यतिरिक्त, यात जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, पुनीत इस्सर, सुदेश बेरी आणि कुलभूषण खरबंदा यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाला उत्तम यश मिळाले. १२ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाने ६६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.