Tuzya Sobatine: तुझ्या सोबतीने...; होणार महाराष्ट्राच्या फेव्हरेट खलनायिकेचा कमबॅक, नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Tuzya Sobatine Marathi Serial: स्टार प्रवाहची नवी मालिका ‘तुझ्या सोबतीने’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एतशा संझगिरी, अजिंक्य ननावरे आणि माधवी निमकर या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहेत.
Tuzya Sobatine Marathi Serial
Tuzya Sobatine Marathi SerialSaam Tv
Published On

Tuzya Sobatine Marathi Serial: स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवीन मराठी मालिकेचा प्रीमियर होणार आहे. ‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच टीआरपीच्या स्पर्धेमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करेल. या नव्या मालिकेचा पहिला प्रोमोही नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या मालिकेत एतशा संझगिरी मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचे पात्र नुपूर एका मोठ्या कंपनीत शेफ म्हणून काम करत आहे. हा तिचा पहिला कामाचा दिवस आहे. असे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. मुख्य नायकाच्या भूमिकेत अजिंक्य ननावरे आहे, ज्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट, मालिका आणि नाट्यकातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Tuzya Sobatine Marathi Serial
Hema Malini: 'एक स्वप्न अपूर्ण राहिलं...'; धर्मेंद्र यांच्या प्रेयर मीटमध्ये हेमा मालिनी भावुक झाल्या

याशिवाय, माधवी निमकर या लोकप्रिय अभिनेत्रीनं या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली आहे. माधवीने यापूर्वी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत शालिनी या व्हिलनच्या भूमिकेने घराघरात लोकप्रियता मिळवली होती आणि तिच्या कमबॅकमुळे चाहते उत्साही झाले आहेत.

Tuzya Sobatine Marathi Serial
Dhurandhar: 'असे चित्रपट कधी कधी...'; धुरंधर चित्रपटाच्या वादावर प्रसिद्ध अभिनेत्याची प्रतिक्रिया

मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून अनेक टीव्ही कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री शिवानी सुर्वेने या मालिकेच्या टीमचं अभिनंदन केलं आहे, तर इतर कलाकार विशाल निकम, समृद्धी केळकर, शर्वरी जोग आणि सुकन्या मोने यांनीही प्रोमोचे कौतुक केले. चॅनेलने मालिकेच्या स्टार्ट डेटबद्दल अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com