'370 की बिर्याणी' या विनोदावरून देशभरात संतापाची लाट
प्रणित मोरेवर नेटकरी भडकले
बॉलिवूड अभिनेत्याने घेतली प्रणित मोरेची बाजू
आपल्या कॉमेडीसाठी कायम चर्चेत राहिलेला 'बिग बॉस १९' चा दुसरा रनरअप प्रणित मोरे सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याच्या स्टँड-अप शोमधील '३७० रुपयांची बिर्याणी' या विधानामुळे प्रणित मोरेला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सामान्य जनता असो की कलाकार अनेकजण या गोष्टीचा निषेध करताना दिसत आहेत. मात्र अशात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर शौरीने कॉमेडी आणि प्रणित मोरे प्रकरणात आपले मत मांडले आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
"कॉमेडीवर आक्रोश/संताप करणे थांबवा, भारत! कॉमेडी आणि कॉमेडियन्सचा अनादर करणारा समाज हळूहळू आत्मपरीक्षण करण्याची क्षमता गमावून बसतो. जय कॉमेडी!"
रणवीर शौरीने प्रणित मोरे किंवा त्या वादाचा थेट उल्लेख केला नसला तरी, अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या या पोस्टचा अर्थ त्या कलाकाराला पाठिंबा दिला असाच लावला आहे. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. यावर कमेंट्सच्या माध्यमातून चर्चा सुरूच राहिली. एका वापरकर्त्याने लिहिलं की, "विनोद आणि पॅसिव्ह ॲग्रेशन यांच्यात एक पुसटशी रेषा असते..." या उत्तर देत रणवीर शौरी म्हणाला, "नाही, कॉमेडीवर ऑनलाइन संताप व्यक्त करणे हे आता पब्लिसिटी आणि सतत चीड-चीड करणाऱ्या लोकांसाठी एक व्यासपीठ बनले आहे... त्यातील अनेकजण अनॉनिमस असतात. केवळ मनमोकळेपणाने हसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामान्य लोकांना विनाकारण टार्गेट केले जाते..." आणखी एका कमेंट्समध्ये रणवीर शौरी म्हणतो की, "जे विनोद आवडतात त्यावर हसा आणि जे आवडत नाहीत त्याकडे दुर्लक्ष करा! जमावासारखे आक्रमक होऊन हल्ला करण्याची गरज नाही..."
प्रणीत मोरेच्या शोमध्ये हिमांशू जांगरा या तरूणाने सांगितले की, तो एका मुलीसोबत डेटवर गेला. त्यांनी ३७० रुपयांची बिर्याणी खाल्ली. ज्याचे बील हिमांशूने भरले. त्यानंतर ती मुलगी घरी जात होती, पण मुलाला बिर्याणीचे ३७० पैसे वसूल करायचे होते. पैसे वसूल करण्याचा अर्थ म्हणजे त्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. या व्हिडीओनंतर हिमांशू जांगराला त्याची नोकरीही गमवावी लागली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.