Divya Agarwal - Apurva Padgaonkar Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

बिग बॉस विनर Divya Agarwal बिझनेसमन अपूर्व पाडगांवकरसोबत अडकली विवाहबंधनात, लग्नाचे क्युट फोटो व्हायरल

Bigg Boss OTT Winner Divya Agarwal: दिव्या अग्रवाल आणि अपूर्व पाडगांवकरने मुंबईतच मित्र परिवार आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साधेपणाने लग्न केले. लग्नामध्ये हे कपल खूपच क्युट दिसत होते. दिव्या आणि अपूर्वने मागच्यावर्षी साखरपुडा केला होता. आता त्यांनी लग्न केले आहे.

Priya More

Divya Agarwal - Apurva Padgaonkar Wedding:

बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) विनर दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) अखेर विवाहबंधनात अडकली. दिव्या अग्रवालने बिझनेसमन अपूर्व पाडगांवकरसोबत लग्न केले. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर 20 फेब्रुवारीला दिव्याने बॉयफ्रेंड अपूर्व पाडगांवकरसोबत लग्न करत आयुष्याची नवी सुरूवात केली. दिव्या अग्रवाल आणि अपूर्व पाडगांवकरने (Divya Agarwal And Apurva Padgaonkar) मराठी रितीरिवाजानुसार लग्न केले. या कपलच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दिव्या अग्रवाल आणि अपूर्व पाडगांवकरने मुंबईतच मित्र परिवार आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साधेपणाने लग्न केले. लग्नामध्ये हे कपल खूपच क्युट दिसत होते. दिव्या आणि अपूर्वने मागच्यावर्षी साखरपुडा केला होता. आता त्यांनी लग्न केले आहे. या कपलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिव्याच्या चाहत्यांनी आणि तिच्या सेलिब्रिटी फेंड्सने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

लग्नामध्ये दिव्या अग्रवाल आणि अपूर्व पाडगांवकरने मॅचिंग आऊटफिट कॅरी केले होते. अपूर्वाने पर्पल कलरचा लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये ती खूपच क्युट दिसत होती. तर अपूर्वने देखील पर्पल कलरची शेरवानी परिधान केली होती. दिव्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये अपूर्व दिव्याला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही सात फेरे घेताना दिसत आहेत. तर तिसऱ्या फोटोमध्ये दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसत आहेत. दिव्याने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या क्षणापासून आमची लव्ह स्टोरी सुरू... रब रखा'

दिव्या अग्रवाल आणि अपूर्व पाडगांवकर यांचे लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडले. दिव्याच्या पोस्टवर प्रिंस नरुना, नायरा बॅनर्जी, अशनूर कौर, मनु पंजाबी आणि अर्चना गौतम यांनी कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, दिव्या अग्रवाल आधी वरुण सूदसोबत रिलेशनशीपमध्ये होती. दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करायचे. दोघे दोन वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिले. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. ८ महिन्यांनंतर दिव्याने सर्वांना सरप्राईज देत बिझनेसमन अपूर्व पाडगांवकरसोबत साखरपुडा केला आणि आता त्याच्यासोबत लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT