Bigg Boss Season 3 Host Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor: करण जौहर, सलमान खान नव्हे तर अनिल कपूर करणार बिग बॉस OTT 3 होस्ट; शोचा नवा प्रोमो आउट

Bigg Boss Season 3 Host: बिग बॉस हा शो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व लवकरच सुरु होणार आहे. हे पर्व सलमान खान नव्हे तर अनिल कपूर होस्ट करणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बिग बॉस ओटीटी ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन सलमान खान करणार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. बिग बॉस ओटीटीचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

'बिग बॉस ओटीटी ३' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन करण जौहरने होस्ट केला होता. परंतु हे प्रेक्षकांना फार आवडले नव्हते.त्यानंतर पुन्हा सलमान खानने दुसरे पर्व होस्ट केले होते. त्यानंतर आता तिसरा सीझन ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर होस्ट करणार आहे. शोच्या नव्या प्रोमोमध्ये अनिल कपूरची नवीन होस्ट म्हणून ओळख करुन दिली आहे. त्यामुळे यंदाचा 'बिग बॉस'चा सीझन प्रेक्षकांना फार आवडणार असल्याचे दिसत आहे.

'बिग बॉस ओटीटी'चे पहिले पर्व करण जोहरने होस्ट केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सलमान खानने बिग बॉस ओटीटीचे दुसरे पर्व होस्ट केले होते. त्यानंतर आता तिसरे पर्व अनिल कपूर होस्ट करणार आहे. अनिल कपूर आपल्या खास शैलीत हे पर्व होस्ट करणार आहेत.

'बिग बॉस ओटीटी ३'चा दमदार ड्रामा लवकरच सुरू होणार. प्रेक्षकांना या शो बद्दल खूप उत्सुकता असून आता नवीन काय होणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

प्रत्येक सीझन हा तितकाच खास ठरला आणि तो अनोखा देखील झाला. त्यानंतर आता आगामी सीझनमध्ये अनिल कपूर कसे स्पर्धकांना कसं सामोरे जाणार हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अनिल कपूर यांच्या होस्ट म्हणून पदार्पण पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. रिॲलिटी शोचा हा अत्यंत प्रतीक्षेत असलेला 'बिग बॉस ओटीटी सीझन ३' 21 जूनपासून OTT वर प्रसारित होणार आहे.

दरम्यान थिएटरच्या आघाडीवर अनिल कपूरने अलीकडेच ‘ॲनिमल’, ‘फाइटर’ आणि ‘क्रू’ या त्याच्या निर्मिती उपक्रमासह सलग हिट चित्रपट दिले. तर अनिल कपूर आता सुरेश त्रिवेणींच्या ‘सुभेदार’ या चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे. या पलीकडे, अभिनेता YRF स्पाय युनिव्हर्समध्ये पाऊल ठेवत असल्याची अफवा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT