Bigg Boss OTT 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3 Promo : बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये हमरीतुमरी; अरमान मलिक-विशालमध्ये कडाक्याचं भांडण; नवा प्रोमो VIRAL

Dispute Between Vishal Pandey and Amaan Malik:' बिग बॉस ओटीटी ३' हे पर्व नुकतंच सुरु झालं आहे. या पर्वात सुरुवातीपासूनच भांडणे पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या नव्या एपिसोडमध्ये अरमान आणि विशालमध्ये भांडण झाले आहे.

Siddhi Hande

'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. बिग बॉस ओटीटीचं तिसरं पर्व सुरु झाले आहे.हे पर्व सुरु झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. बिग बॉसच्या घरात रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. रोज भांडणे होताना पाहायल मिळता. 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये आता विशाल आणि अरमान मलिकची भांडणे होताना दिसत आहे.

बिग बॉसच्या घरात अरमान आणि विशालमध्ये खटके उडत असतात. त्यातच आता आणखी वाद सुरू झाला आहे.बिग बॉसच्या एपिसोडची सुरुवातीला अरमान मलिक विशाला पांडेला त्याचा मोबाईल लपवल्याबद्दल ओरडला. त्यानंतर त्याची पत्नी कृतिकादेखील रागावते. यानंतर काही वेळाने, अरमानने विशालला चिडवले. त्याच्या कच्चा बदाम वर तयार केलेल्या रिलबद्दल बोलून चिडवले. त्यानंतर विशालने त्याला चेतावणी दिली.

अरमान त्याला सतत चिडवत होता. त्यानंतर विशालदेखील अरमानवर भडकला. विशाल म्हणाला, 'तू माझ्या कन्टेटवर काहीही बोलाची हिम्मत कर मग मी तुला चांगलाच धडा शिकवतो', असं प्रत्युत्तर दिलं. यानंतर मात्र, त्यांचा वाद आणखीनच चिघळला. अरमानने तर विशालला मच्छर म्हटले. त्यानंतर त्यांच्यातील भांडण आणखीनच वाढले. विशालने त्याला खलजान म्हणून चिडवले. त्यांचे हे भांडण अजूनच वाढताना दिसत आहे. याचाच प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'बिग बॉस ओटीटी ३' चं पर्व प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहे. बिग बॉसच्या या पर्वाची चर्चा सोशल मिडियावर नेहमी होत असते. मागच्या आठवड्यात पायल मलिक शोमधून बाहेर पडली आहे. पायल ही अरमानची पहिली बायको आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT