Armaan Malik Second Wife Kritika Shocking Statement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kritika Malik Statement : "दुसऱ्याचा पती वापरते, टॉवेल काय चीज", कृतिका मलिकच्या विधानाने खळबळ

Armaan Malik Second Wife Kritika Shocking Statement : 'बिग बॉस ओटीटी ३'च्या एपिसोडमध्ये, अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकनं अरमानबरोबरच्या लग्नाबाबत विधान केलंय.

Chetan Bodke

यूट्यूबर अरमान मलिकने 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये त्याच्या दोन बायका पायल मलिक आणि कृतिका मलिकसोबत एन्ट्री घेतली. बिग बॉसच्या घरात अरमानने दोन्ही पत्नीसोबत एन्ट्री केल्यामुळे चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी नाराजी आहेत. दरम्यान, पायल मलिक अनेकवेळा अरमान आणि कृतिकाच्या लग्नाबद्दल बोलताना आणि तिचं दु:ख व्यक्त करताना शोमध्ये दिसली. याबद्दल बोलताना ती अनेकदा भावूक झाली आहे. आता 'बिग बॉस ओटीटी ३'च्या एपिसोडमध्ये, अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकनं अरमानबरोबरच्या लग्नाबाबत विधान केलंय.

व्हायरल व्हिडिओमध्ये, अरमान मलिकसोबतच त्याच्या दोन्हीही पत्नींना कंटेस्टंट पौलमी दास विचारते की, तुम्ही एकमेकांचे टॉवेल वापरतात का ? या प्रश्नाचं उत्तर अरमान मलिक देतो, "होय, आम्ही पती, पत्नी आहोत. तर एकमेकांचे आम्ही टॉवेल वापरतो." कृतिका मलिकच्या विधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कृतिका मलिक पौलमी दासला म्हणते, "जर दुसऱ्यांच्या पतींचा मी वापर करत असेल तर टॉवेल काय गोष्ट आहे." कृतिकाचं हे विधान ऐकूण पौलमी दास अवाक झाली.

सध्या कृतिका मलिकच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगत आहे. अनेकजण मैत्रिणीच्याच पतीसोबत लग्न केल्यामुळे कृतिकाला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. कृतिका मलिक ही अरमान मलिकची दुसरी पत्नी आहे. पायलसोबत घटस्फोट न घेताच अरमानने कृतिकासोबत लग्न केले. कृतिका आणि अरमानला एक मुलगा आहे तर पायल आणि अरमानला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. विशेष म्हणजे अरमान मलिक, कृतिका आणि पायल हे एकाच घरात राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

SCROLL FOR NEXT