Nikki Tamboli Slams Varsha Usgaonkar Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : ‘वर्षा उसगांवकरांच्या गुडघ्यात मेंदू...’, रितेश देशमुखने झापल्यानंतरही निक्की तांबोळी काही सुधरेना

Varsha Usgaonkar And Nikki Tamboli News : शनिवारी झालेल्या 'भाऊचा धक्का'मध्ये रितेश देशमुखने निक्की तांबोळीची चांगलीच कानउघडणी केली आहे. पण तरीही निक्की तांबोळी काही सुधरायाचं नाव घेत नाहीये.

Chetan Bodke

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरू होताच चांगलंच चर्चेत आलं आहे. पहिल्याच दिवसापासून निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील वाद रंगला आहे. दोघींमधील वादाने अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. काल झालेल्या 'भाऊचा धक्का'मध्ये रितेश देशमुखने निक्की तांबोळीची चांगलीच कानउघडणी केली आहे.

रविवारच्या एपिसोडमध्ये 'भाऊचा धक्का'मध्ये बिग बॉसने टेबलवर काही फोटो ठेवले आहेत. तो फोटो तुम्ही कोणाला डेडिकेट करता असं एक टास्क होतं. या टास्कमधील निक्की तांबोळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

'कलर्स मराठी'च्या इन्स्टाग्राम हँडलवर आजच्या एपिसोडमधील 'भाऊचा धक्का'वरील काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत निक्की तांबोळीला बिग बॉसने बोलावलं. बोलावल्यानंतर तिला डेस्कवर ठेवलेल्या पाकिटातील एक पाकिट उचलायला सांगितलं. या पाकिटात एक फोटो आहे. तो फोटो स्पर्धक कोणाला डेडिकेट करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं. बिग बॉसने निक्की तांबोळीला पुढे बोलवलं. यामध्ये, तेव्हा तिला एका पाकिटातील फोटो काढायला सांगितला. त्यामध्ये गुडघ्यात मेंदू असा फोटो होता.

हा फोटो निक्कीने वर्षा उसगांवकर यांना डेडिकेट केला आहे. हा फोटो वर्षाताईंना डेडिकेट करताना तिने यावेळी कारण मात्र वेगळं दिलंय. तिच्या त्या कारणाची जोरदार चर्चा होते. ती म्हणते, "कोणाला देऊ हा फोटो मला काही कळत नाहीये. परत जर मी त्यांना तो फोटो डेडिकेट केला तर सगळेच मला म्हणतील की तू मोठ्या माणसांचा अपमान करते. म्हणून मला नाही खेळायचं" असं काही नाही, तू हा खेळ ओपनली खेळ. असं रितेश निक्कीला म्हणाले. यावर पुढे निक्की म्हणाली, "मी हा फोटो वर्षाताईंना डेडिकेट करते. मी खरंतर अपमान करत नाहीये. त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना मी हा फोटो डेडिकेट करते."

यावेळी रितेश देशमुख यांनी निक्कीला डॉ.निक्की तांबोळी म्हणून संबोधलं. सध्या सोशल मीडियावर निक्कीची पुन्हा एकदा तुफान चर्चा होत असून तिला अनेकांनी ट्रोल केले आहे. अनेक फॅन्सने वर्षाताईंच्या गुडघ्यात मेंदू नाही. खरंतर तुझ्याच गुडघ्यात मेंदू आहे, असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT