टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक फेमस शोपैकी एक असलेल्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये फक्त मराठी सेलिब्रिटीच नाही तर अनेक सोशल मिडिया इन्फ्लूएंसरही सहभागी झाले आहेत. या सोशल मिडिया इन्फ्लूएंसरमध्ये रीलस्टार गोलीगत सूरज चव्हाणचाही समावेश आहे. त्याच्या खास स्टाईलचा फॅन्स क्लब अनेक मराठी सेलिब्रिटीही आहे. त्याला अनेक मराठी सेलिब्रिटी पोस्ट शेअर करत पाठिंबा देताना दिसत आहे. अशातच 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरज चव्हाणला मिळणाऱ्या वागणुकीवरून संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने सूरज चव्हाणला पाठिंबा दिला आहे. तसेच सूरजला मिळणारी वागणूक पाहून संताप व्यक्त केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अंकुर वाढवेने लिहिले की,
“दोन्ही वेळेची भांडी, साफसफाई, चपला ज्या त्याच्या नाहीत तरीही सूरजने का करावं? सूरजसारखा काहीच होऊ शकत नाही (जे समाजवेगळे दिसतात, वागतात, बोलतात अशा सगळ्याना बोलणारे ९०%) तो या शोमध्ये या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतोय. तरीही सगळ्यांना आपला गेम खेळायचा आहे. पण तो सगळं बघून घाबरलाय. हापशीवर (हँडपंप) होणाऱ्या भांडणापेक्षा हे लय बेकार आहे आणि एवढे सुंदर दिसणारे लोक असे का वागत असतील? कदाचित यात तो अडकलाय. बाकी लोकं, भांडी घासता येत नाही म्हणून रडणारे आणि जरी तुझे जोडे नसतील तर ते बाजूला ठेव सांगणारे आणि माझे नाहीत मी नाही उचलणार म्हटल्यावर सूरजवर चढ चढ चढतात! बाकी जातीवाद, वर्णवाद आणि वर्गवाद, सहानुभूती यावर मी बोलू शकत नाही. एवढी माझी समज नाही”
मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी सूरज चव्हाणला पोस्ट शेअर करत पाठिंबा दिला आहे. पुष्कर जोग, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, किरण माने अशा अनेक कलाकारांनी 'बिग बॉस मराठी ५'बद्दल पोस्ट शेअर केली आहे. गोलीगत सूरज चव्हाणने आपल्या खास स्टाईलने फक्त प्रेक्षकांनाच नाही तर अनेक मराठी सेलिब्रिटींनाही आपलेसे केले आहे. त्याच्या स्टाईलचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. सूरजचे इन्स्टाग्रामवर ९ लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तो मूळचा बारामतीचा असून सूरज सर्वाधिक प्रसिद्धीझोतात 'टिक टॉक' मुळे आला होता. त्याला 'टिक टॉक'च्या पहिल्या दहात स्थान मिळवले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.