Bigg Boss Marathi New Promo  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात फुलतंय प्रेम; अरबाजने निक्कीसाठी बनवलं टॉमेटोपासून हटके 'दिल'; VIDEO पाहून म्हणाल...

Bigg Boss Marathi New Promo Out: बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व नुकतेच सुरु झाले आहे. बिग बॉसच्या घरात भांडण,तंटा आणि प्रेम होताना दिसत आहे. शोच्या नवीन भागात अरबाजने निक्कीसाठी 'दिल' तयार केले आहे.

Siddhi Hande

'बिग बॉस' मराठीचा पाचवा सीझन नुकताच सुरु झाला आहे. बिग बॉसमध्ये पहिल्याच दिवसांपासून भांडण-तंटा आणि नॉमिनेशन, आणि प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. बिग बॉसमध्ये दोन सदस्यांमध्ये प्रेम फुलताना दिसत आहे. शोच्या येत्या भागात निक्की ताबोली आणि अरबाज पटेलमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. (Bigg Boss)

'बिग बॉस'चा नवीन प्रोमो कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यात अरबाज पटेल निक्की तांबोळीवर (Arbaaz Patel-Nikki Tamboli) लाइन मारताना दिसत आहे.अरबाज निक्की तांबोळीसाठी नेहमी काहीतरी नवीन करताना दिसत आहे. येत्या भागात तर अरबाजने निक्की तांबोळीसाठी टॉमेटोचे दिल तयार केले आहे.

प्रोमोमज्ये अरबाज पटेल, निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर किचनमध्ये दिसत आहे. किचनमध्ये अरबाज टॉमेटो कापताना दिसत आहे. त्याने या टॉमेटोपासून निक्कीसाठी खास दिल तयार करताना दिसत आहे.यानंतर अरबाज निक्की तांबोळीशी प्रेमाने बोलताना दिसत आहे. यानंतर मात्र अंकिता वालावलकर अरबाजचा दिल तोडून टॉमेटोची फोडणी टाकताना दिसत आहे. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Bigg Boss Marathi New Promo)

'बिग बॉस'च्या पहिल्या दिवसापासूनच निक्की अरबाजवर फिदा असल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता अरबाजलाही निक्की आवडू लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या या सीझनमध्ये निक्की आणि अरबाजमध्ये प्रेमाचं नातं फुलणार का? हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये प्रेम फुलताना प्रेक्षकांनी पाहिलं आहे. त्यामध्ये आता अरबाज- निक्कीचे नाव जोडले जाणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

बिग बॉसच्या कालच्या भागात निक्की आणि अंकितामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अंकिताला रडू कोसळले होते. तर दुसरीकडे योगिता आणि जान्हवीमध्येही जोरदार भांडण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT