‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सुरू होऊन जेमतेम दोन आठवडे झाले आहेत. दोन आठवड्यातच शोला प्रेक्षकांची पसंदी मिळत आहे. पहिल्या आठवड्यात 'भाऊच्या धक्का'वर निक्की तांबोळीची कानउघडणी केली होती. तर आता दुसऱ्या आठवड्यात रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरची कानउघडणी केली आहे. जान्हवीला कालच्या 'भाऊचा धक्का'वर बोलण्यावरून आणि वागण्यावरून रितेश देशमुखने चांगलंच झापलं आहे.
जान्हवीने गेल्या आठवड्यांत वर्षा उसगांवकर आणि अभिजीत सावंतवर अगदी निकृष्ट दर्जाची भाषा वापरत तिने त्यांच्यावर टीका केली होती. त्या सर्वच गोष्टींचा आधार घेत रितेशने जान्हवीची अख्ख्या महाराष्ट्रासमोर खरडपट्टी काढली. तिने गेल्या आठवड्यात एका भांडणात अभिजीतला बांगड्या घाल असं म्हणाली होती. वर्षा उसगांवकर यांना आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्र सरकारकडून तीन पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारावरून जान्हवी वर्षा उसगांवकरांवर टीका केली होती. तिच्या याच वक्तव्यावरून रितेश देशमुखने तिला चांगलेच खडेबोल सुनावले.
त्यासोबतच जर तुझं बोलणं असंच कायम राहिलं तर मी बाकीच्यांना बाहेर काढेन की नाही माहीत नाही. पण तुम्हाला नक्की काढेन, असं वक्तव्य केलं आहे. यावेळी जान्हवी शोमध्ये रडली. जान्हवीला या आठवड्यामध्ये कमालीचा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. यावेळी पंढरीनाथ कांबळेसह काही स्पर्धकांना तुम्ही बिग बॉसच्या घरात आले आहात का ? कोणत्या ट्रीपला आला आहात ? असा सवालही यावेळी अभिनेत्याने स्पर्धकांना विचारले. याशिवाय अंकिता वालावलकरचं पहिली कॅप्टन झाल्यामुळे अभिनंदनही केलं.
सलग दुसऱ्या आठवड्यातही गुलिगत सूरज चव्हाणची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. यावेळी रितेशने त्याचे कामावरून चांगलेच कौतुक केले आहे. सूरज चव्हाणकडे गार्डन्स एरियामध्ये साफसफाई करण्याचे काम दिले आहे. तो ते काम कोणतीही लाज न बाळगता काम करताना दिसला. यामुळे त्याचे फक्त रितेशनेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राने कौतुक केले. सूरजने आपल्या गुलिगत स्टाईलने हटक्या पद्धतीने खेळ खेळत सर्वांचीच बोलती बंद केली. त्याच्या खेळाची चांगलीच चर्चा होत आहे.
दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, निखिल दामले, घन:श्याम दराडे आणि पंढरीनाथ कांबळेला एलिमिनेट करण्यात आले आहे. आता या स्पर्धकांमधून कोणता स्पर्धक नॉमिनेट होणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील बाहेर पडले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.