Jacqueline Fernandez Birthday : टीव्ही रिपोर्टर ते एक प्रसिद्ध अभिनेत्री, जॅकलिन फर्नांडिसबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत का?

Jacqueline Fernandez Struggle : जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या आरस्पानी सौंदर्याच्या जोरावर तिने अख्ख्या जगाला घायाळ केलं आहे. आज या सौंदर्यवतीचा ३९ वा वाढदिवस आहे.
Jacqueline Fernandez Career Struggle
Jacqueline Fernandez Birthday
Published On

जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या आरस्पानी सौंदर्याच्या जोरावर तिने अख्ख्या जगाला घायाळ केलं आहे. आज या सौंदर्यवतीचा ३९ वा वाढदिवस आहे. मुळची श्रीलंकन असलेल्या जॅकलिनचा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. जॅकलिनचा आज (११ ऑगस्ट) वाढदिवस आहे. तिचा जन्म १९८५ साली श्रीलंकेत झाला आहे. तिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर अवघ्या इंडस्ट्रीवर भुरळ घातली आहे.

Jacqueline Fernandez Career Struggle
Shweta Tiwari : 'पलक तर हिच्यापेक्षा वयाने मोठी दिसते', 43 वर्षीय श्वेता तिवारीची रेखाशी तुलना

जॅकलिन फर्नांडिसच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्याबद्दल जाणून घेऊया... जॅकलिनचा जन्म श्रीलंकेतल्या कोलंबोत ११ ऑगस्ट १९८५ ला झाला आहे. अभिनेत्रीने तिचे सुरुवातीचे शिक्षण बहरीनमध्ये पूर्ण झाले आहे. त्यानंतर तिने ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. ग्रॅज्युएशननंतर जॅकलीनने काही काळ श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणूनही काम केले. जॅकलिन करियरच्या काळात श्रीलंकेत मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमावलं. रिपोर्टिंग करत असतानाच जॅकलिनने मॉडेलिंगलाही सुरुवात केली. त्यानंतर जॅकलिनने २००६मध्ये मिस श्रीलंकाचा मुकुट पटकावला. याशिवाय जॅकलिनने 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत श्रीलंकेचे प्रतिनिधित्वही केले होते.

मॉडेल म्हणून यशस्वी झाल्यानंतर जॅकलीनला जगभरातून वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स मिळू लागल्या. पण याचदरम्यान ती मॉडेलिंग प्रोजेक्टसाठी २००९ मध्ये भारतात आली. जिथून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. तिला भारतात आल्यानंतर सुजॉय घोष यांच्या 'अलादीन' चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत रितेश देशमुख आणि अमिताभ बच्चन होते. अभिनय क्षेत्रात पदार्पण करताच जॅकलिनला अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी ऑफर मिळू लागल्या. 'अलादीन' नंतर जॅकलिनला 'मर्डर २' ची ऑफर मिळाली. या चित्रपटानेच जॅकलिनला विशेष ओळख मिळाली. यानंतर जॅकलिनने 'हाऊसफुल २', 'रेस २', 'किक', 'हाऊसफुल ३', 'रेस ३' सारख्या अनेक हिट चित्रपटांत काम केले.

Jacqueline Fernandez Career Struggle
KBC 16 Super Sawaal : 'कौन बनेगा करोडपती'च्या नव्या पर्वात होणार मोठे बदल, स्वतः अमिताभ बच्चन यांनी सांगितले नियम

२०२२ मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या 'रामसेतू' चित्रपटातही जॅकलीन प्रमुख भूमिकेत होती. जॅकलिनने 'विक्रांत रोना' या कन्नड चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत अभिनेता किच्चा सुदीप होता. जॅकलिन एक प्रसिद्ध अभिनेत्री असून शिवाय तिने अनेक टीव्ही शोमध्येही जजची भूमिकाही निभावली आहे. जॅकलिन बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. ती स्वयंपाकातही खूप हुशार आहे. तिला विविध पदार्थ बनवण्याची आवड असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

Jacqueline Fernandez Career Struggle
Amruta Khanvilar-Himashu Malhotra: अमृता खानविलवकर नवरा हिमांशू मल्होत्रापासून राहते वेगळी; कारण काय? जाणून घ्या

जॅकलिनने आतापर्यंत ४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून यातील तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. पण असं असलं तरीही ती आज कोट्यवधींची मालकीन आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलिनची एकूण संपत्ती १०१ कोटी रुपये आहे. जॅकलिन एका चित्रपटासाठी ५ ते ६ कोटी रुपये मानधन घेते. जॅकलिनने गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील जुहू परिसरात नवं घरं घेतलं. शिवाय अभिनेत्रीकडे अनेक महागड्या कार्सचं कलेक्शनही आहे. श्रीलंकेत जॅकलिनचे स्वतःचे बेट देखील आहे. जॅकलीन फर्नांडिसचे मुंबईतल्या वांद्रेत आणि दुसरं श्रीलंकेत स्वत:च्या मालकीचं हॉटेल आहे.

Jacqueline Fernandez Career Struggle
Bigg Boss Marathi 5 : 'भाऊचा धक्का'वर रितेश देशमुख कोणत्या स्पर्धकाची शाळा घेणार, आज कोण होणार नॉमिनेट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com