Bigg Boss Marathi 5 Latest News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरात चाललाय प्रेमाचा चहा उतू, स्पर्धकांमध्ये बनू लागल्या जोड्या; निक्की तांबोळी 'या' सदस्यावर फिदा

Bigg Boss Marathi 5 Latest Update : बिग बॉस सुरू होऊन एक दिवस होतात ना होतात तेच पहिल्या दिवसापासूनच प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे.

Chetan Bodke

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवत आहे. पहिल्या दिवशी सदस्यांना पाणी नसणं आणि नाश्ता न मिळणं अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. 'बिग बॉस'चं घर म्हटल्यावर घरात प्रेम, वाद आणि तंटा आलाच. आता बिग बॉस सुरू होऊन एक दिवस होतात ना होतात तेच पहिल्या दिवसापासूनच प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे.

'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरच्या दिवशी निक्की तांबोळीने रितेश भाऊसमोरच स्प्लिट्सविला फेम अरबाज पटेलवर फिदा झालेली दिसून आली. आता दुसऱ्या दिवशी छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे निक्की आणि अरबाज यांना ग्रीन सिग्नल देताना दिसून येणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या दिवसाचा प्रोमो समोर आला असून दुसऱ्याच दिवशी घरातील सदस्य रोमँटिक अंदाजात दिसून आले आहेत. व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये, निक्की तांबोळी किचनमध्ये चहा बनवायला जाते. पण हीटर चालत नसल्याने ती छोटा पुढारीला 'बिग बॉस'कडे हीटर सुरू करून देण्याची विनंती करते.

तर निक्कीचं म्हणणं ऐकून छोटा पुढारी 'बिग बॉस'ला म्हणतो," किमान आमच्या वहिनींचं तरी 'बिग बॉस'..." त्यावर अरबाज त्याला म्हणतो,"थांबरे सकाळी सकाळी असं काय म्हणतो तू..." पुढे त्याच्या ह्या विधानावर छोटा पुढारी म्हणतो,"तुझं प्रेम उतू चाललंय ते सांगतोय... चहा उतू गेला तर काही बिघडत नाही." छोटा पुढारीच्या या विधानावर निक्की पोट धरून हसते. तर अरबाजने हसत- हसत डोक्यालाच हात लावला. त्यानंतरही छोटा पुढारी पुढे म्हणतो, "प्रेमात असंच असतंय बिग बॉस..." छोटा पुढारीमुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरात हास्य कल्लोळ होतो.

'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी अरबाजकडे पाहून लाजताना दिसली होती. अरबाजला पाहून सगळंच विसरल्याचं ती बिग बॉसच्या घरात म्हणाली होती. रितेश भाऊलाही निक्की थोडं थोडं काहीतरी होऊ शकतं असं म्हणाली होती. " आता तर निक्कीला सगळीकडे मीच दिसेन, माझ्याशिवाय तिला दुसरं काही सुचणार नाही." असं अरबाज म्हणाला होता. त्यामुळे आता 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनमध्ये निक्की आणि अरबाजची जोडी जमणार का? याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या दिवशी बिग बॉसच्या घरात, पाणी नव्हतं आणि नाश्ता नव्हता. त्यामुळे पहिल्याच दिवशी सर्व स्पर्धकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आता दुसऱ्या दिवशीही हीटर बंद असल्यामुळे बिग बॉसच्या घरात आता काय पाहायला मिळणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT