Manasvi Choudhary
केसं धुतल्यानंतर केसांची योग्य प्रकारे काळजी घेणे महत्वाचे आहे. केस ओले असताना त्यावर तेल लावावा की नाही असा प्रश्न अनेकांना आहे.
ओल्या केसांवर तेल लावण्याआधी त्यांची काळजी घेणे महत्वाचे आहे. केस ओले असताना तेल लावल्यास ते चिकट होतात.
केस धुतल्यानंतर ते पूर्णपणे निथळू द्या. जेव्हा केस थोडे ओलसर असतील, तेव्हा हातावर फक्त २-३ थेंब तेल घेऊन फक्त केसांच्या टोकांना लावा यामुळे केसांच्या मुळांना तेल मिळते.
पाणी आणि तेल एकमेकांत मिसळत नाहीत. जर केस जास्त ओले असतील, तर तेल केसांच्या आत जाण्याऐवजी फक्त वरच्या थरावरून निसरडे होते.
केस व्यवस्थित सुकल्यानंतर केसांना तेल लावणे कधीही फायदेशीर ठरेल यामुळे केसांमध्ये तेल नीट राहील
ओल्या केसांच्या मुळांना कधीही तेल लावू नका. यामुळे डोक्यात कोंडा होऊ शकतो. तेल फक्त केसांच्या लांबीवर आणि टोकांना लावा.
केस धुतल्यानंतर जर तुम्हाला मऊ आणि चमकदार हवे असतील, तर ओल्या केसांच्या फक्त टोकांना अगदी थोडे तेल लावा.