Gautami Patil Dancer: महाराष्ट्राचा बिहार करू नका, अन्यथा.., छोटा पुढारी घनःश्याम दराडेचा गौतमीला इशारा

Ghanshyam Darade Warn Gautami Patil: गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नका, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल, असा इशारा घन: श्याम दराडेने दिला आहे.
Ghanshyam Darade Warn Gautami Patil
Ghanshyam Darade Warn Gautami PatilSaam TV

Ghanshyam Darade Warn Dancer Gautami Patil: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे सूत्र ठरलेलच आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम मध्येच बंद करण्याची वेळही येते. तिच्या नृत्यापेक्षा सध्या या राड्याचीच चर्चा अधिक असते.

यावरून गौतमीला टीकेला सामोरं जावं लागतं. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलवर इंदुरीकर महाराज यांनी टीका केली होती. आता छोटा पुढारी घन:श्याम दराडेने देखील गौतमीवर टीका केली आहे.  (Breaking Marathi News)

Ghanshyam Darade Warn Gautami Patil
Samruddhi Mahamarg Accident: भरधाव कारचा टायर फुटला अन् अनर्थ घडला; समृद्धी महामार्गावर भयानक अपघात, पाहा VIDEO

गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नका, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल, असा इशारा घन: श्याम दराडेने दिला आहे. पंढरपूरमध्ये (Pandharpur) विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर घन:श्याम दराडे यांने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने गौतमीवर टीका केली.

राज्यातील छोटा पुढारी म्हणून नावारूपाला आलेला घनश्याम दराडे याने आज गौतमी पाटीलवर तोफ डागली. दराडे याचा 'मुसंडी' हा चित्रपट येणार असल्याने तो विठ्ठल दर्शनासाठी आला होता. सध्या गौतमी पाटीलवार टीका केली कि लगेच प्रसिद्धी मिळते याची जाणीव असल्याने तिच्यावर अनेकजण तोंड सुख घेताना दिसतात. (Latest Marathi News)

Ghanshyam Darade Warn Gautami Patil
Cotton Market Price: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! तुरीच्या दराने गाठला १० हजारांचा टप्पा; कापसाचा भावही वाढणार?

तसाच प्रकार आज या छोट्या पुढाऱ्याने देखील केला. यापूर्वी देखील घनश्याम याने गौतमी हिच्यावर टीका केली होती. आपला आणि तिचा कोणताही वाद नसला तरी ती लावणी बदनाम करीत असल्याचे घन:श्याम दराडेने म्हणत गौतमीने देखील आपला मुसंडी चित्रपट पाहावा असे आवाहन केले. मात्र लावणीला बदनाम करून महाराष्ट्राचा बिहार करायचा प्रयत्न केल्यास आपण मुसंडी मारू, असा इशाराही त्याने दिला.

नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा

नाशिकमध्ये मंगळवारी, १६ मे रोजी गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अशातच हुल्लडबाज तरुणांनी कार्यक्रमात राडा घालण्यास सुरूवात केली होती. यावेळी काही पत्रकार आणि पोलीस या तरुणांची समजूत काढण्यासाठी गेले. तेव्हा या तरुणांनी थेट पत्रकारांना मारहाण केली. या मारहाणीत पत्रकार जखमी झाले असून त्यांना मुका मार देखील लागला. यानंतर पोलिसांनी ६ हुल्लडबाजांना अटक केली.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com