Cotton Market Price: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! तुरीच्या दराने गाठला १० हजारांचा टप्पा; कापसाचा भावही वाढणार?

Cotton Rate Today: अवकाळी पाऊस आणि गारपीटीने हतबल होऊन बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा देशातील तुरीचं उत्पादन घटलं असून तुरीची मागणी चांगलीच वाढली आहे.
cotton rate today maharashtra
cotton rate today maharashtraSaam TV

Maharashtra Cotton Price: अवकाळी पाऊस आणि गारपीटीने हतबल होऊन बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा देशातील तुरीचं उत्पादन घटलं असून तुरीची मागणी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे तुरीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आज तुरीला या हंगामातील सर्वाधिक '१० हजार' रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे इतका भाव मिळाला आहे. (Latest Marathi News)

cotton rate today maharashtra
Crime News: लग्नानंतर नवरा नोकरीसाठी शहराबाहेर गेला; बायको पडली दिराच्या प्रेमात, त्यानंतर...

यंदा देशातील तुरीच उत्पादन घटलं असून तुरीला चांगली मागणी होत आहे, त्यात यावर्षी तुरीच्या हंगाम सुरुवातीपासूनच दणक्यात झाला आहे. दरवर्षी तुरीचा हंगाम तूरीच्या भावांमुळे गजला जातो. परंतू या हंगामात कधी नव्हे ते तूर उत्पादक 'शेतकऱ्यांना अच्छे दिन' आल्याचे दिसत आहे. अकोला  (Akola)  कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (१८ मे) तुरीला या हंगामातील सर्वाधिक '१० हजार' रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे इतका भाव मिळाला आहे.

देशातील इतर बाजार समित्यांतही तुरीला सरासरी चांगला भाव मिळतो आहे. तुरीच्या बाजार भावातील हीच तेजी कायम राहिल्यास लवकरचं आगामी दिवसात हे भाव सहजपणे ११ हजारांचा टप्पा गाठू शकतो, असा अंदाजही कृषी बाजार समितीतील बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

अकोला कृषी बाजार समितीत मंगळवारी ८ हजार ८९५ रूपये जास्तीत जास्त तुरीला भाव होता. या दराच्या तुलनेत दोन दिवसांत १ हजार १०५ रुपयांनी तुरीच्या दरात वाढ झाली आहे. आज तुरीला या हंगामातील सर्वाधिक दर मिळाला आहे, तो म्हणजे ६ हजार ५०० रूपयांपासून १० हजार रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला.

cotton rate today maharashtra
Nashik Crime: कौटुंबिक वाद विकोपाला! दाजीने हातोडीने वार करत मेहुण्याला संपवलं; धक्कादायक घटनेनं खळबळ

कापसाचे भाव वाढणार का?

एकीकडे तुरीच्या दराने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे कापसाला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे (Cotton Price) शेतकरी चिंतेत आहे. कापसाला सध्या ७ हजार २०० ते ८ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. मागील तीन दिवसांपासून कापसाच्या दरात सतत घट होत गेली. कापसाच्या वायद्याने निचांकी ७ हजार २०० ते ८ हजार रुपयांचा टप्प गाठला.

कापसाचे दर दबावात असल्याने तेजीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढवली. कापसाच्या भावात सतत घसरण सुरु आहे. कापसाच्या दराने मागील दोन महिन्यांमध्ये अपेक्षित सुधारणा दाखवली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. शेतकऱ्यांना यंदा चांगल्या भावाची अपेक्षा होती. पण बाजारात आवकेचा हंगाम नसतानाही दरावरील दबाव कायम आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com