Bigg Boss Marathi 5 Canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5 : माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही; रितेशने जान्हवीला दाखवली तिची जागा

Big Boss Marathi 5 New Promo: बिग बॉसच्या घरातील जान्हवीची दादागिरी बंद होणार का? रितेश भाऊ तिला बाहेरचा रस्ता दाखवणार का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील सर्वच सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला आहे. या आठवड्यात जान्हवीला चांगलच ट्रोल करण्यात आलं आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेदेखील जान्हवीला तिची जागा दाखवली आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ जान्हवीला म्हणाला,"माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही".

'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात जान्हवी पॅडी दादांना म्हणाली होती,"आयुष्यभर अॅक्टिंग केली आता इथे येऊन ओव्हरअॅक्टिंग करताय". त्यावर जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला,"जान्हवी तुम्ही 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातील एक वाईट सदस्य आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनस जावं याची लिमिट असते. डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त तीन महिन्यांपूरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात...तुमचा ओव्हर कॉन्फिडिन्स तुम्हाला नडणार आहे".

रितेश भाऊ पुढे म्हणाला,"तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात. लोकांना सगळं दिसतंय. तुम्ही मेलोड्रामा करता. सगळे कॅमेरे स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न करता. पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय. कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो.

खोटं वागण्याला एक लिमिट असते. आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे. या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे. हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय. करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते..लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे. आजनंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT