Big Boss Marathi-5: वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना डीपीने टोचले निक्कीचे कान, व्हिडिओ व्हायरल

Big Boss Marathi-5 Dhanjay Pawar : धनंजय पवार म्हणजेच डीपीने निक्की तांबोळीला तिच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्या देताना त्याने निक्कीला कानपिचक्या दिल्या आहेत.
Big Boss Marathi-5 Dhanjay Pawar
Big Boss Marathi-5 Dhanjay Pawar
Published On

बिग बॉस मराठीचे ५ वे सिझन चालू आहे. अनेक गोष्टी या घरात घडत आहेत. बिग बॉसचा शो सुरू झाल्यापासूनच लोकप्रिय ठरलाय. आता मराठी बिग बॉसचं ५ वे सिझन सुरू आहे. हा शो सुरू होण्याची वाट लाखो चाहते वाट पाहत असतात. या शोच्या प्रत्येक सिझनमध्ये कोण असणार, काय होणार, कोणते किस्से गाजणार, कोणाचा राडा होणार अशा सगळ्या गोष्टींची उत्सुकता रसिकांमध्ये असते. या शोमध्ये ड्रामा, अॅक्शन पाहायला मिळते. असाच मनोरंजनाचा तडका बिग बॉस मराठी सिझन ५ पाहायला मिळत आहे.

यंदा बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतला अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठी सिझन ५ चे होस्टींग करताना दिसत आहे. रितेश त्याच्या लयभारी स्टाईलने घरातल्या सदस्यांची कानउघडणी करताना दिसत आहे. प्रत्येक सदस्याचा शेलक्या शब्दात समाचार घेताना दिसत आहे. सदस्यांची चूक, त्यांचं वागणं यावरून तो त्यांचा शाळा घेत असतो. सदस्यांबरोबरच रितेशनेही लोकांच्या मनाला वेड लावलेलं आहे.

कलर्स मराठी वर असणाऱ्या बिग बॉस सिझनचा५ च्या सदस्यांनी पहिल्याच आठवड्यात राडा घालायला सूरुवात केली. काहीच दिवसात बिग बॉस मराठीचा टीआरपी वाढत असल्याचं ही कानावर आलं. रितेश देशमुखची लयभारी स्टाइल आणि बिग बॉसच्या घरातले सदस्यांनी इतर वाहिन्यांवरील कार्यक्रमांना मागे टाकून एक इतिहास रचला आहे.

बिग बॉस मराठीमध्ये सतत काही ना काही घडत असतं आणि व्हायरल होत असतं. कोण अपमान करतयं, कोण माफी मागतयं तर कोण राडाच करतयं, कोण मैत्रीसाठी धडपड करतयं, असं आपण बघतो. बिग बॉसच्या घरातील एका सदस्याचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. निक्की तांबोळीचा वाढदिवस साजरा केला जाणार असून डीपी (धनंजय पवार) ने निक्कीला शुभेच्छा दिल्या आहेत. निक्कीला शुभेच्छा देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर रिलीज झालाय.

हा व्हिडिओ लोकांना फार आवडलाय. २१ ऑगस्टला निक्कीचा वाढदिवस होता. त्यात डीपी (धनंजय पवार) ने निक्कीला "तूम जिओ पंचाहत्तर साल" अशा शुभेच्छा देत दिसतोय. फिल्मी स्टाईलने डीपीने तिला शुभेच्छा दिल्यात. गुडघ्यावर बसून हात जोडत त्याने तिला शुभेच्छा दिल्या. त्यात तो तिच्या वागण्याबद्दल स्पष्टचं बोलत होता. आणि तिच्या सौंदर्यांच कौतूकही करताना दिसत आहे. .

धनंजय पवारला डीपी नावाने ओळखलं जातं. तो सोशल मीडिया कटेंट क्रिएटर असून त्याचे मोठे फॉलोअर्स आहेत. बिग बॉसच्या घरातील काही मोजकेच सदस्य आहेत, ज्यांच्या नावाची चर्चा होते. त्यापैकी एक म्हणजे डीपी. मागे एकदा डीपीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यात डीपी सूरजला आपल्या अगळ्या वेगळ्या अंदाजात समजवत होता.

Big Boss Marathi-5 Dhanjay Pawar
Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात पार पडणार नॉमिनेशनचा नवीन टास्क, कोण कोणाला करणार नॉमिनेट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com