Kiran Mane Viral Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran Mane: सातारच्या बच्चनची शिवाजी महाराजांबद्दल खास पोस्ट, चाहत्यांना पोस्टच्या माध्यमातून सांगितली महाराजांची 'महती'...

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत किरण मानने उत्कट पोस्ट लिहिली आहे.

Chetan Bodke

Kiran Mane Post: बिग बॉस मराठी फेम किरण माने नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. किरण मानेच्या पोस्टने पुन्हा एकदा चाहत्यांचे मन आपल्याकडे वळवले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होत त्याने त्रिवार अभिवादन केले. त्यांच्या कार्याबद्दल असलेल्या माहितीविषयी त्याने उत्कट पोस्ट लिहिली आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच मानेची साताऱ्यात भव्य दिव्य मिरवणुक निघाली होती. त्यावेळी किरण माने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यासमोर नतमस्तक झाला होता. तो फोटो पोस्ट करत किरण माने सोशल मीडियावलर लिहितो, 'शिवराय कशाच्या सहाय्यानं लढले? शारीरिक बळाच्या? तलवारीच्या? की कुणा सहकार्‍याच्या सल्ल्याच्या? नाय नाय नाय माझ्या दोस्तांनो... शिवरायांची ताकद एकच होती... त्यांची 'अनल्प' बुद्धी !'

''अनल्प' म्हणजे अफाट, अमर्याद. इंग्लिशमध्ये सांगायचं तर इन्फिनाईट इन्टेलिजन्स. शिवरायांच्या विलक्षण बुद्धीमत्तेचं वर्णन करताना परमानंदानं हा शब्द वापरलाय. परमानंद... एक अत्यंत प्रतिभावान शिवकालीन कवी ! होय, तोच तो ज्यानं शिवरायांच्या हयातीत, शिवरायांच्या परवानगीनं त्यांचं चरीत्र लिहीलं !!'

'शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा कसा बाहेर काढला, आग्र्याहून कशी शिताफीनं सुटका करून घेतली, शाहिस्तेखानावर कसा छुपा हल्ला केला. या सुरस कथा आपण कायम ऐकतो... पण हे सगळं त्यांनी फक्त ताकदीवर, किंवा शस्त्रास्त्रांच्या मदतीनं केलं नाही... प्रत्येक लढाई शिवराय 'बुद्धीनं' लढले. शक्तीचा आणि शस्त्रांचा वापर करण्याआधी, त्यांच्या प्रत्येक चालीवर बुद्धीचा लगाम होता. खर्‍या अर्थानं 'मास्टरमाईंड' !'

'माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्या कर्तबगारीचा उगम मेंदूतूनच होतो. आपण कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असूद्यात... तिथे आपण जे काही 'ॲचिव्ह' करतो, कमावतो, पराक्रम गाजवतो, त्या सगळ्याचं मूळ असते 'बुद्धी'. आपलं बोलणं, आपल्या हालचाली, आपली ताकद, आपण व्यक्त होण्यासाठी जे जे काही वापरतो... मन असो वा मनगट, पेन असो वा पिस्तूल... कशालाही ताकद देण्याचं, योग्य दिशा दाखवण्याचं, भान आणि नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असेल तर 'बुद्धी' !'

'...आपल्याला जर शिवरायांच्या महान कार्याचा अभिमान बाळगायचाय, तर त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींबरोबरच या 'अनल्प बुद्धी'चा वारसा घेणं आजच्या काळात लै लै लै गरजेचं आहे. विवेकाच्या शत्रूचा सामना करताना, जर बुद्धीनं लढायचं तंत्र आपण शिकलो, तर सच्च्या शिवभक्ताला कुठलीबी लढाई अवघड नाही !!! जय शिवराय.'

अशी पोस्ट करत किरण मानेने शिवाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त केलाय. किरण माने लवकरच महेश मांजरेकरांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT