Devmanus: उद्या रंगणार "देवमाणूस" माणूस होण्याची गोष्ट, नाटकाचा २५वा प्रयोग सादर होणार...

प्रथमच मराठी रंगभूमीवर आंतरराष्ट्रीय विषयावर आधारित असलेल्या "देवमाणूस" या नाटकाचे मायबाप रसिक प्रेक्षक, समीक्षक या सर्वांकडून कौतुक होत आहे.
Devmanus Play In Thane Theater
Devmanus Play In Thane TheaterSaam Tv
Published On

Devamanus Theater In Thaane: २६ डिसेंबर २०२२ रोजी मराठी रंगभूमीवर हे नाटक दाखल झाले. प्रथमच मराठी रंगभूमीवर आंतरराष्ट्रीय विषयावर आधारित असलेल्या "देवमाणूस" या नाटकाचे मायबाप रसिक प्रेक्षक, समीक्षक या सर्वांकडून कौतुक होत आहे.

Devmanus Play In Thane Theater
MC Stanच्या मानधनात घसघशीत वाढ, आकडा वाचाल तर येईल आकडी

या आधी भद्रकाली प्रॉडक्शन्स निर्मित असलेले ‘संगीत देवबाभळी’ या नाटकातून प्राजक्त देशमुख (लेखक-दिग्दर्शक), आनंद ओक (संगीत दिग्दर्शक), प्रफुल्ल दीक्षित (प्रकाशयोजनाकार) आणि शुभांगी सदावर्ते (अभिनेत्री) यांचे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पदार्पण झाले.

Devmanus Play In Thane Theater
Viral Video: शाहरुखच्या 'पठान' मधील गाण्यावर BTS आर्मीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

त्याचप्रमाणे ‘देवमाणूस’ या नाटकातून शंतनू चंद्रात्रे (लेखक), जयेश आपटे (दिग्दर्शक), शुभम जोशी, सायली सावरकर (संगीत), अपूर्वा शौचे (वेशभूषा) तसेच कलाकार श्रीपाद देशपांडे, प्रणव प्रभाकर, दुर्गेश बुधकर, आशिष चंद्रचूड, शर्वरी पेठकर, ऋतुजा पाठक यांचे देखील व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पदार्पण झाले.

अशा या नाटकाचा २५ वा प्रयोग उद्या रवि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथे सादर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com