Bigg Boss 16 Fame MC Stan: 'बिग बॉस १६' या रिॲलिटी शोची ट्रॉफी जिंकल्यानंतर एम.सी. स्टॅनच्या नावाची सर्वत्र हवा आहे. स्टॅनची विजेता म्हणून निवड झाल्यानंतर त्याने माध्यमांसोबत संवाद साधला. सोबतच त्याने लाईव्ह येताच अनेक रेकॉर्ड्स देखील मोडीत काढले आहे. 'बिग बॉस १६'ची त्याने ट्रॉफी घेतल्यानंतर त्याच्या मानधनात देखील घसघशीत आता वाढ होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमसी स्टॅनचे Amazon Mini TV सोबत आधीच करार झाला आहे. तो आता लवकरच अधिकाधिक ब्रँड्ससोबत करार करण्यासाठी चर्चा करीत आहे. फॅशन, म्युझिक, अॅक्सेसरीज, गेमिंग आणि ई-स्पोर्ट्सच्या ब्रँडसोबत चर्चा करीत आहे.
एका मीडिया अहवालानुसार, सोशल मीडियावर सध्या त्याच्या रील्स बऱ्याच चर्चेत आहे. स्टॅन रीलच्या माध्यमातून लाखो रुपये कमावतो. एका स्टोरीसाठी स्टॅन जवळपास ५ ते ७ लाख रुपयांची मागणी करतो. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच आता त्याची किंमत जवळपास ३० ते ४०% ने सहज वाढली आहे.
स्टॅनने बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच कुठे कुठे लाईव्ह कॉन्सर्ट करणार याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 3 मार्च पुणे, 5 मार्च मुंबई, 10 मार्च हैद्राबाद, 11 मार्च बेंगळुरू, 17 मार्च इंदूर, 18 मार्च नागपूर, 28 एप्रिल अहमदाबाद, 29 एप्रिल जयपूर, 6 मे कोलकाता तर 7 मे ला दिल्लीत परफॉर्म करणार आहे. तुम्ही Book My Show वरून 'इंडिया टूर 2023' साठी तिकीट बुक करू शकता.
'बिग बॉस १६' मधून बाहेर पडताच एमसी स्टॅनने अलीकडेच इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत लाईव्ह संवाद साधला. बिग बॉसमधून आल्यानंतर त्याचे हे पहिले लाईव्ह होता, त्यात त्याने अनेक सेलिब्रिटींचे रेकॉर्ड मोडित काढले आहे. त्याच्या लाईव्हमध्ये 5 लाख 40 हजारांहून अधिक चाहते सामील झाले होते. एमसी स्टॅनला इंस्टाग्रामवर मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती त्यात तो म्हणतो, 'आप लोग की दुआ है. धन्यवाद फॅम.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.