Heeramandi First Look: संजय लीला भन्साली यांनी साकारली झगमगती 'हीरामंडी'; वेबसीरीजचा फर्स्टलूक आऊट

'हीरामंडी' हा संजय लीला भन्साली यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
Heeramandi First Look
Heeramandi First LookInstagram @netflix_in
Published On

Sanjay Leela Bhansali's Heeramandi First Look Out: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक संजय लीला भन्साली त्यांच्या बिग बजेट चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. भन्साली यांचे चित्रपट ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य असतात. तसेच त्यात अगदी छोट्यात-छोटी गोष्टीकडे लक्षपूर्वक पहिले जाते. आता भन्साली यांनी 'हीरामंडी' या वेबसीरीजची घोषणा केली आहे.

नेटफ्लिक्सवर 'हीरामंडी' या वेबसीरीजच पहिला लूक शेअर करण्यात आला आहे. भन्साली यांची वेबसीरीज त्यांच्या चित्रपटांप्रमाणे भव्य-दिव्य आहे. या फर्स्टलूकसाठी शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक सुंदर संगीत देखील वाजत आहे.

Heeramandi First Look
Pathan Record: 'पठान' १००० कोटी पार? बाहुबली २चा रेकॉर्ड मोडण्यासाठी निर्मात्यांनी वापरला अनोखा फंडा

'हीरामंडी'चे फर्स्टलूक प्रदर्शित करताना व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, संजय लीला भन्साली तुम्हाला जगात आमंत्रित करत आहेत जिथे तवायफ राण्या होत्या.' संजय लीला भन्साली यांच्या या वेबसीरीजमध्ये तीन पिढ्या दाखविण्यात आल्या आहेत. 'हीरामंडी' लाहोरमधील एका भागाचे नाव आहे. जो मुघल काळात तवायफमुळे ओळखला जायचा.

'हीरामंडी'मध्ये सोनाक्षी सिंह, अदिती राव हैदरी, रिचज चढ्ढा, संजिदा शेख, मनीषा कोईराला, शर्मिला शेहागल सारखे मोठमोठे दिग्गज दिसणार आहेत. फस्ट लूकमध्ये सर्व अभिनेत्री गोल्डन आऊटफिटमध्ये आणि पारंपरिक अवतारात दिसत आहेत. या लूकसह या वेबसीरीज संदर्भात इतर माहिती देखील शेअर करण्यात आली आहे.

'हीरामंडी' हा संजय लीला भन्साली यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे त्यांनी आधीच सांगितले होते. स्वतंत्रपूर्व भारतावर आधारित या वेबसीरीजमध्ये प्रेम, धोका, राजकारण आणि तवायफ कल्चर दाखविण्यात आले आहे.

'बाजीराव मस्तानी', पद्मावत आणि 'हम दिल दे चुके सनम'सारखे चित्रपट दिल्यानंतर संजय लीला भन्साली यांच्या 'हीरामंडी'कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. 'हीरामंडी' संजय लीला भन्साली यांची पहिले वेबसीरीज आहे.

'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट अशाच आशयाचा होता. ज्यात आलिया भट्टने काम केले होते. या चित्रपट हिट ठरला होता. त्यामुळे आता 'हीरामंडी' पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com