Nandamuri Taraka Ratna Death: दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरचे चुलत भाऊ आणि तेलगू देशम पार्टीचे नेते नंदामुरी तारक रत्न यांचे निधन झाले आहे. ३९ वर्षीय नंदामुरी यांनी शनिवारी शेवटचा श्वास घेतला.
नंदामुरी यांच्या निधनाने संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अल्लू अर्जुन, चिरंजीवीसह अनेक कलाकारांनी आणि फॅन्सनी नंदामुरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे एक राजकीय रॅली दरम्यान नंदामुरी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. २७ जानेवारीला एका पदयात्रेत नंदामुरी सहभागी झाले होते. पदयात्रेच्या सुरुवातीलाच ते जमिनीवर कोसळले.
जमिनीवर कोसळतच त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर तारक रत्न यांना पुढील उपचारांसाठी नारायण हृदयालय बेंगळूर येथे नेण्यात आले.
तारक रत्न यांची प्रकृती गंभीर होती. त्यांनी शनिवारी १८ फ्रेब्रुवारी रोजी शेतवचा श्वास घेतला. तारक रत्न २३ दिवस हॉस्पिटलमध्ये मरणाशी झुंज देत होते. तारक रत्न दिग्गज अभिनेते आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एन. टी. रामराव यांचे नातू आणि नंदामुरी मोहन कृष्ण यांचे सुपुत्र आहेत.
तारक रत्न राजकारणात येण्याआधी तेलगू चित्रपटांमध्ये सक्रिय होते. त्यांचा पहिला चित्रपट 'ओकाटो नंबर कुर्राडु' हा होता.
सोशल मीडियावर टॉलिवूड स्टार्स आणि राजकीय नेत्यांनी तारक रत्न यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी, तेदेपाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू, अभिनेते चिरंजीवी, केंद्रीय पर्यटन नातरी जी. किशन रेड्डी यांनी तारक रत्न यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.